
Sindhudurg Monkey : सिंधुदुर्ग जिल्ह्यात वन्य प्राण्यांकडून मोठ्या प्रमाणात शेतीची होणारे नुकसानी लक्षात घेता सरकारने तातडीनं यावर उपाययोजना करण्यासाठी पावले उचलली पाहिजेत. यामध्ये प्रामुख्याने माकडांचा उपद्रव रोखण्यासाठी त्यांची नसबंदी करण्याबाबत सरकारने निर्णय घेऊन तशी परवानगी वन खात्याला द्यावी, अशी मागणी शासनाकडे करणार असल्याची माहिती माजी खासदार, ब्रिगेडियर सुधीर सावंत यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.