कोकण : जयगड रिगॅसिफिकेशन टर्मिनल मार्चमध्ये सुरू होणार

regasification terminal start in jaigad kokan from march month in next year
regasification terminal start in jaigad kokan from march month in next year

रत्नागिरी : एच-एनर्जी आणि होग एलएनजी होल्डिंग कंपनी यांच्यासोबत एफएसआरयू करार झाला आहे. दहा वर्षांच्या करारांतर्गत फ्लोटिंग स्टोरेज आणि रिगॅसिफिकेशन युनिट (एफएसआरयू) पुरविण्यात येणार असून एच-एनर्जी मार्च २०२१ मध्ये त्यांचा जयगड एलएनजी रिगॅसिफिकेशन टर्मिनल सुरू होईल. हे भारतातील पहिले एफएसआरयूवर आधारीत टर्मिनल असेल.

एफएसआरयू एच-एनर्जीच्या जयगड प्रकल्पात पोहचविण्यात २०२१ या वर्षातील पहिल्या तिमाहीचे लक्ष आहे. २०१७ साली बांधलेल्या होग जायंटची साठवणूक क्षमता १ लाख ७० हजार लिटर आहे. त्याची कमाल रिगॅसिफिकेशन क्षमता ७५० एमएमएससीएफडी (अंदाजे ६.० एमएमटीपीए) इतकी आहे. एफएसआरयूतर्फे नॅशनल गॅस ग्रिडला जोडणाऱ्या ५६ कि.मी. लांबीच्या जयगड-दाभोळ पाइपलाइनला रिगॅसिफाइड एलएनजी पुरविण्यात येणार आहे. त्याचबरोबर एलएनजी ट्रक लोडिंग सुविधेमध्येही ऑनशोअर एलएनजी पुरविण्यात येईल. 

बंकरिंग सेवांसाठी इतर एलएनजी जहाजात एलएनजी रिलोड करण्याची क्षमताही एफएसआरयूकडे आहे. या डिलिव्हरीनंतर एच-एनर्जी मार्च २०२१ मध्ये त्यांचा जयगड एलएनजी रिगॅसिफिकेशन टर्मिनल प्रकल्प सुरू होईल. भारतातील नैसर्गिक वायूच्या वापरात अनेक पटींनी वाढ झाली आहे. सक्षम, किफायतशीर आणि ग्राहक केंद्री एलएनजी व्हॅल्यू चेन असलेली भारतीय कंपनी म्हणून एच-एनर्जी आपले अस्तित्व प्रस्थापित करेल. होगसारख्या अनुभवी कंपनीशी भागीदारी करताना आम्हाला अत्यंत आनंद होत असल्याचे एच एनर्जीचे मुख्य कार्यकारी अधिकारी दर्शन हिरानंदानी यांनी पत्रकात स्पष्ट केले.
 

शहर गॅस वितरण ओपन ॲक्‍सेस..

ग्राहकांना ट्रकमधून एलएनजीचा पुरवठा करण्यासाठी जयगड एलएनजी टर्मिनलमध्ये ट्रक लोडिंग सुविधाही केली आहे. या वाहतुकीसाठी इंधन म्हणून एलएनजी आणि सीएनजीचा वापर वाढावा, यासाठी भारतभर एल-सीएनजी स्टेशन्स विकसित करण्याची एच-एनर्जीची योजना आहे. या माध्यमातून भारताच्या पर्यावरण धोरणाशी सुसंगत असे योगदान देता येईल.

जयगड प्रकल्पातून पहिला गॅस मार्च २०२१ मध्ये पुरविण्यात येईल. भारत सरकार आणि पेट्रोलियम व नैसर्गिक वायू नियामक मंडळाने यासाठी सकारात्मक पावले उचलली आहेत. एकीकृत दर आणि शहर गॅस वितरण ओपन ॲक्‍सेस यांचा समावेश यात केला आहे.

संपादन - स्नेहल कदम 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com