esakal | पूर्णगड किल्ल्याचे रुपडे पालटतेय
sakal

बोलून बातमी शोधा

पूर्णगड किल्ल्याचे रुपडे पालटतेय

‘‘महाराष्ट्रातील गडकिल्ले इतिहासाची साक्ष देतात. या किल्ल्यांमुळे नव्या पिढीला प्रेरणा, प्रोत्साहन मिळावे, यासाठी किल्ल्यांचे संवर्धन होणे गरजेचे आहे.’’
- हेमंत गोडबोले,
पुणे 

पूर्णगड किल्ल्याचे रुपडे पालटतेय

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पावस - रत्नागिरी तालुक्‍यातील पूर्णगड येथील शिवकालीन किल्ला पर्यटकांना आकर्षित करीत आहे. पुरातत्त्व विभागातर्फे त्याचे रुपडे पालटत पर्यटकांना पर्वणी ठरणार आहे, मात्र किल्ल्याचे बांधकाम कासवगतीने सुरू आहे. छत्रपती शिवाजी महाराजाचे गडकिल्ले हीच खरी दौलत होती. त्यानंतर गडकिल्ल्याची दयनीय अवस्था झालेली आहे.

त्याकाळची कामाची क्षमता व गुणवत्ता यामुळेच किल्ले आजही इतिहासाची साक्ष देत आहे. अशा तऱ्हेने पूर्णगड येथील किल्ला त्यावेळेचा कामाचा दर्जा ३५० वर्षानंतरही दाखवून देतो. तो गुणवत्तापूर्वक कामाचे प्रतीक आहे. गेली अनेक वर्षे किल्ला दुरुस्ती संदर्भात वारंवार मागणी करण्यात आली होती, मात्र शासनाने दुर्लक्ष केले होते. सध्याचा किल्ला हा टेहेळणीसाठी वापरला जात होता. या किल्ल्यावरून गावखडी सुरुबन, खाडी व अथांग समुद्र आणि निसर्गरम्य परिसर आकर्षित करणारा आहे.

शिक्षण व सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे यांच्या विशेष प्रयत्नाने पुरातत्व विभागाने किल्ले दुरुस्ती करिता ५ कोटीचा निधी उपलब्ध करून दिला आहे. त्यातील एक कोटीचा निधी प्राप्त झाला असून त्याचे बांधकाम सुरू आहे. किल्ल्याच्या तटबंदीबैकी एक तटबंदी ढासळली होती. तिचे जांभ्या दगडाने बांधकाम करण्यात आले. तसेच दोन चबुतरे बांधण्यात आले. किल्ल्याच्या तटबंदीतून टेहळणीसाठी वापरला जाणारा तट जांभा दगडांनी बांधण्यात येत आहे. त्यामुळे पर्यटकांना किल्ल्यावरून फिरणे, समुद्राचे दर्शन घेणे सुलभ होणार आहे. किल्ला सुशोभीकरणाचे काम पूर्ण झाल्यानंतर रत्नागिरी-राजापूर सागरी मार्गावरील हा किल्ला पर्यटकांसाठी पर्वणी ठरणार आहे. 

‘‘महाराष्ट्रातील गडकिल्ले इतिहासाची साक्ष देतात. या किल्ल्यांमुळे नव्या पिढीला प्रेरणा, प्रोत्साहन मिळावे, यासाठी किल्ल्यांचे संवर्धन होणे गरजेचे आहे.’’
- हेमंत गोडबोले,
पुणे 
 

आयताकृती पूर्णगड 

आयताकृती पूर्णगड पाहायला हवा अर्धा तास किल्ल्याच्या दाराजवळ मारुती मंदिर आहे. मंदिराजवळच पूर्णगडाचा दरवाजा आहे. शिवकालीन बांधकामाच्या वैशिष्ट्‌यांप्रमाणे हा दरवाजा लपवलेला आहे. दरवाजावर गणेश तसेच चंद्र- सूर्याची शिल्पे आहेत. प्रवेशद्वाराच्या आत पहारेकऱ्यांच्या देवड्या आहेत. येथेच दगडात कमळे कोरलेली पहायला मिळतात. लहानसा आयताकृती आकार असलेला पूर्णगड पाहायला अर्धा तास पुरतो.

loading image