esakal | दिलासादायक : सिंधुदुर्गात त्या कोरोना बाधित रुग्णाचा रिपोर्ट निगेटिव्ह...

बोलून बातमी शोधा

Report of negative Corona infected patient in Sindhudurg  kokan marathi news

सिंधुदुर्ग जिल्ह्यात आतापर्यंत एकमेव कोरोना बाधित रुग्ण आढळला आहे. 26 मार्च रोजी त्याचे तपासणी नमूने प्राप्त होत ते पॉझिटिव्ह आले होते. त्यानंतर त्याच्यावर उपचार करीत त्याचा पहिला नमूना तपासणीसाठी पाठविण्यात आला होता.

दिलासादायक : सिंधुदुर्गात त्या कोरोना बाधित रुग्णाचा रिपोर्ट निगेटिव्ह...
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

ओरोस (सिंधुदुर्ग) :  सिंधुदुर्ग जिल्ह्यात आढळलेल्या कोरोना बाधित रुग्णाची दूसरी चाचणी निगेटिव्ह आली आहे. ही बाब जिल्हावासीय व जिल्हा प्रशासन यांना दिलासा देणारी आहे. तसेच यामुळे जिल्ह्याची पावले कोरोनामुक्तच्या दिशेने सुरु झाली आहेत. 

सिंधुदुर्ग जिल्ह्यात आतापर्यंत एकमेव कोरोना बाधित रुग्ण आढळला आहे. 26 मार्च रोजी त्याचे तपासणी नमूने प्राप्त होत ते पॉझिटिव्ह आले होते. त्यानंतर त्याच्यावर उपचार करीत त्याचा पहिला नमूना तपासणीसाठी पाठविण्यात आला होता.

जिल्ह्याची पावले कोरोनामुक्तीकडे

हेही वाचा-तबलिगीशी संबंधितांच्या संपर्कात आलेली ती व्यक्ती आयसोलेशनमध्ये

त्याचा अहवाल शुक्रवारी प्राप्त झाला असून तो निगेटिव्ह आला आहे. याचाच अर्थ सदर रुग्ण कोरोना मुक्त होण्याच्या मार्गावर आहे. अजुन एकदा त्याची टेस्ट केली जाणार आहे. ही टेस्ट निगेटिव्ह आल्यास तो कोरोना मुक्त होणार आहे. त्यामुळे दूसरी टेस्ट निगेटिव्ह आल्यावर त्याला डिस्चार्ज देण्यात येणार आहे.