ज्यांने दिला मदतीचा हात, त्याच्याच घरी घुसली कोरोनाची साथ...

राजेंद्र दळवी 
Tuesday, 28 July 2020

आपले गाव महामारीच्या विळख्यात सापडू नये.याउद्देशाने  या संशोधकाने केली मदत मात्र....

आपटी (कोल्हापूर) : पन्हाळा येथील रहिवाशी असलेल्या एका संशोधकाने देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याचे पाहून आपल्या गावातील नागरिकांचा कोरोना पासून बचाव व्हावा व आपले गाव महामारीच्या विळख्यात सापडू नये याउद्देशाने पन्हाळा  नगरपरिषद व तालुका आपत्ती व्यवस्थापन अधिकाऱ्यांकडे साहित्य खरेदीसाठी तब्बल दिड लाख रुपयांची मदत दिली होती.आशा गावाशी नाळ जोडलेल्या व्यक्तीची ८३ वर्षीय आई काल कोरोना बाधित झाली.

पन्हाळा शहर कोरोनामुक्त राहणेसाठी नागरपरिषदेने गेली चार महिने  शहराचे प्रवेशद्वार बंद करून घेतलेली दक्षता, तर मुख्याधिकारी डॉ. कैलास चव्हाण यांनी जनजागृती साठी शहरात फिरून लोकांना केलेले मार्गदर्शन  ही सर्व उपाय योजना तोकडी पडली व पन्हाळ्यात कोरोनाने एन्ट्री केली.

हेही वाचा- सात दिवसांत इंधनाचे वाचले 56 कोटी -

काल  कोरोना बाधित झालेल्या आजी  पूर्वीपासूनच आजारी होत्या.त्यांची दोन वेळा ह्रदय शस्त्रक्रिया झाल्याने त्या अंथरुणाला खिळून होत्या. त्यामुळे त्यांचा गावात कोणाशी संपर्क आलेला नाही.पण त्यांची सेवाशुश्रूषा करण्यासाठी काही लोक त्यांच्या कडे जात होते. त्या गेल्या चार दिवसापासून  जास्तच आजारी होत्या.म्हणून  त्यांना कोल्हापुरातील दवाखान्यात उपचारासाठी दाखल केले होते.

हेही वाचा-परदेशी फुटबॉलपटू किती फायद्याचे?...कोणी केला सवाल...वाचा फुटबॉल प्रशिक्षकांचे म्हणणे -

तेव्हा त्यांना न्युमोनिया झाल्याचे निदान झाले.तर  त्यांच्या घशातील श्रावाची तपासणी केली असता त्याचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह  आला.त्यामुळे आपल्या गावात कोरोनाची साथ पसरू नये आपला गाव कोरोना पासून सुरक्षीत रहावा.म्हणून  कोरोना विरुद्ध लढा देणेसाठी आपत्ती व्यवस्थापनला ज्यांने दिला मदतीचा हात, त्याच्याच घरी  कोरोनाने शिरकाव केला... 

संपादन - अर्चना बनगे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Researcher mother coronavirus infected in panhala kolhapur