-दुर्मिळ झाडांच्या लागवडीसाठी धामणीवासीय सरसावले

-दुर्मिळ झाडांच्या लागवडीसाठी धामणीवासीय सरसावले

- rat११p१४.jpg-
२४M८९३२१
संगमेश्वर ः महामार्गाशेजारी रोपांची लागवड करताना धामणील ग्रामस्थ

वृक्ष लागवडीसाठी धामणीवासीय सरसावले

सकाळ वृत्तसेवा ः
संगमेश्वर, ता. ११ ः मुंबई-गोवा महामार्गाच्या दुतर्फा असलेली पूर्वीची मोठी झाडे प्रवासी व वाटसरूंना सावली देत होती; परंतु महामार्ग चौपदरीकरणाचे काम सुरू झाल्यानंतर ही झाडे तोडण्यात आली. त्यामुळे रस्त्याला सावली मिळणे दुर्मिळ झाले. उन्हापासून बचाव करताना लोकांना सध्या कसरत करावी लागत आहे. धामणी येथील तरुणांनी सामाजिक बांधिलकीतून रस्त्यालगत वृक्ष लागवड केली आहे.
महामार्गासाठी झाडे तोडली गेली असली तरीही रस्त्याच्याकडेला झाडे लावणे गरजेचे आहे जेणेकरून आतापासूनच प्रत्येकाने यथाशक्ती व उत्स्फूर्तपणे सावलीसाठी उपयोगी असलेली झाडे श्रमदान स्वरूपात वृक्षारोपणास उपयुक्त आहेत. प्रत्येकाने या कामात हातभार लावला तर नष्ट झालेली सावली पुन्हा मिळवू, असा निश्चय धामणी येथील ग्रामस्थांनी केला. त्यामधूनच वेळ काढून ग्रामस्थांनी वृक्षारोपण सुरू केले आहे. नियमित कामातून वेळ काढून सर्वांनी एकत्र येत अशाप्रकारे वृक्षारोपण सुरू केले आहे. मिळतील ती रोपे घेऊन रस्त्याच्या बाजूला लावून पुन्हा सावली मिळवण्यासाठी धडपड सुरू झाली आहे. वृक्षारोपणासाठी एकत्र आलेले अजित कोळवणकर, सिद्धेश खातू, प्रथमेश घाणेकर, प्रणव कोळवणकर, स्वप्नील सुर्वे आदींनी एक चांगला संदेश या निमित्ताने दिला आहे. प्रत्येकाने एकतरी झाड रस्त्याच्या कडेला लावा, असे आवाहन त्यांनी केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com