गुहागर तालुका राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामे 

सकाळ वृत्तसेवा
Friday, 13 September 2019

गुहागर - आमदार भास्कर जाधव यांना समर्थन देण्यासाठी गुहागर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या 11 सदस्यांनी प्राथमिक सदस्यत्वासह पदाचे राजीनामे दिले. राजीनामे जिल्हाध्यक्ष बाबाजी जाधव यांच्याकडे पाठविल्याची माहिती तालुकाध्यक्ष विनायक मुळे यांनी दिली.

यामध्ये विनायक मुळे (तालुकाध्यक्ष), इकबाल दळवी (उपाध्यक्ष), वसंत किल्लेकर (उपाध्यक्ष), कृष्णा उकार्डे (सरचिटणीस), नेत्रा ठाकुर (महिला अध्यक्ष), समित घाणेकर (युवक अध्यक्ष), राज वंजारे (विद्यार्थी अध्यक्ष), सिद्धिविनायक जाधव (गुहागर शहर अध्यक्ष), सुभाष शितप (ओबीसी सेल अध्यक्ष), लतिफ लालू (अल्पसंख्यांक सेल अध्यक्ष) आणि दिलीप मोहिते(मागास वर्ग सेल अध्यक्ष) यांचा समावेश आहे. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Resignation of NCP activists in Guhagar Taluka