अगामी निवडणुकीसाठी काँग्रेसच्या हलचाली, कार्यकारिणीत जुन्या-नव्यांची मोट

निवडणुका लक्षात घेऊन काँग्रेसने जास्तीत जास्त लोकांकडे जबाबदाऱ्‍या देण्यावर भर दिलाय
Congress
Congressesakal
Summary

निवडणुका लक्षात घेऊन काँग्रेसने जास्तीत जास्त लोकांकडे जबाबदाऱ्‍या देण्यावर भर दिलाय

रत्नागिरी : काँग्रेस जिल्हाध्यक्ष अविनाश लाड यांचे पदभार स्वीकारल्यानंतर बनवण्यात आलेली जिल्हा कमिटी मंजूर झाली आहे. जिल्ह्यातील जुन्या-नवीन पदाधिकाऱ्‍यांचा समावेश असलेल्या जंबो कार्यकारिणीत ८० पेक्षा जास्त सभासदांचा समावेश आहे. कार्यकारिणीत नवीन कार्यकर्त्यांना सर्वाधिक संधी देण्यात आली असल्याचे काँग्रेसकडून सांगण्यात आले. रत्नागिरीचे माजी नगरसेवक संजय उर्फ बाळा मयेकर यांना सरचिटणीसपदावर संधी दिली आहे.

काँग्रेसला स्थैर्य मिळवून देण्यासाठी प्रदेशस्तरावरून जिल्हाध्यक्षपदी अविनाश लाड यांची नियुक्ती करण्यात आली होती. उर्वरित पदांवरील नियुक्त्या करण्यासाठी सभासद नोंदणी कार्यक्रम हाती घेण्यात आला. बुथ तेथे काँग्रेसचे कार्यकर्ते अशी मोहीम राबवण्यात आली होती. त्यानंतर जिल्ह्याची कार्यकारिणी तयार करून ती मंजुरीसाठी पाठविण्यात आली होती. त्याला नुकतीच प्रदेशस्तरावरून मंजुरीही आली आहे.

Congress
केजरीवालांचा मास्टर स्ट्रोक; विदर्भातील बडा नेता राज्यसभेवर जाणार?

यामध्ये जुन्या-नव्यांचा मेळ साधण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. यामध्ये वरिष्ठ उपाध्यक्षपदी अनिरुद्ध कांबळे, खजिनदार दिलीप बोथले यांची नियुक्ती केली आहे. उपाध्यक्षपदी ज्येष्ठ कार्यकर्ते अशोक जाधव यांना पुन्हा संधी देतानाच २१ जणांची उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. सुरेश कातकर, संतोष शिर्के, बाळा मयेकर, प्रसाद उपळेकर यांच्यासह २४ जणांची सरचिटणीस, ३० जणांची चिटणीस आणि सात सदस्य अशा नियुक्त केल्या आहेत. प्रवक्तापदी चिपळूणचे इब्राहिम दलावाई यांना संधी देण्यात आली आहे.

अंतर्गत वाद निर्माण होणार नाहीत..

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेऊन काँग्रेसने जास्तीत जास्त लोकांकडे जबाबदाऱ्‍या देण्यावर भर दिला आहे. अंतर्गत वाद निर्माण होणार नाहीत, यासाठी जिल्ह्याच्या कार्यकारिणीत पद देऊन समाधान करण्यावर काँग्रेसकडून भर देण्यात आला आहे.

Congress
'त्या' विकृत इसमाविरुद्ध कडक कारवाई करा, पोस्टवर आव्हाड संतापले

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com