दहा दिवसांपूर्वी त्यांना ईडी अधिकारी असल्याचे भासवून त्यांच्या मोबाईलवर फेक कॉल आला. आपण ज्या कार्यालयात सेवा बजाविली त्या सेवेच्या कार्यकाळात झालेल्या आर्थिक व्यवहारांची चौकशी झाली असून त्यात आपण दोषी असल्याचे सांगितले.
बांदा: तालुक्यातील एका गावातील निवृत्त शासकीय अधिकाऱ्याला (Retired Government Officer) ईडीच्या (ED) कारवाईची भीती दाखवत १३ लाख रुपयांना गंडा घालण्यात आला. संबंधित अधिकाऱ्याने संशयिताच्या सांगण्यावरून पूर्ण रक्कम धनादेशाच्या माध्यमातून विविध बँक खात्यांत आठ दिवसांत भरणा केली. आजदेखील (ता. ३) ते उर्वरित चार लाख रुपये बँकेत भरण्याच्या तयारीत होते.