निवृत्त पोलिसाच्या मुलाचा घरातील दागिण्यावर डल्ला

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 20 जुलै 2019

रत्नागिरी - निवृत्त पोलिसाच्या मुलानेच घरातील 2 लाख 68 हजार 500 रुपयांच्या सोन्याच्या दागिन्यांवर डल्ला मारला. त्या ठिकाणी नकली दागिने ठेवले. याबाबत त्याच्या आईने विचारणा केली. तेव्हा त्याने स्वतःच्या लहान मुलाला विष पाजून ठार मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी संशयित मुलगा व सून यांना ग्रामीण पोलिसांनी अटक केली. न्यायालयाने त्याना तीन दिवस पोलिस कोठडी सुनावली आहे. 

रत्नागिरी - निवृत्त पोलिसाच्या मुलानेच घरातील 2 लाख 68 हजार 500 रुपयांच्या सोन्याच्या दागिन्यांवर डल्ला मारला. त्या ठिकाणी नकली दागिने ठेवले. याबाबत त्याच्या आईने विचारणा केली. तेव्हा त्याने स्वतःच्या लहान मुलाला विष पाजून ठार मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी संशयित मुलगा व सून यांना ग्रामीण पोलिसांनी अटक केली. न्यायालयाने त्याना तीन दिवस पोलिस कोठडी सुनावली आहे. 

अमोल अनंत भोसले (वय 35 ) व आदिती अमोल भोसले (वय 35, मूळ एमआयडीसी- मिरजोळे, सध्या - सती संभाजी नगर ता. चिपळूण, शिवराम कदम यांच्या घरी भाड्याने ) अशी संशयितांची नावे आहेत. ही घटना 21 जून 2017 ते 27 जून 2019 या कालावधीत मिरजोळे एमआयडीसी येथे घडली होती.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार तक्रारदार अनंत पर्शुराम भोसले (वय 61, रा. प्लॉट, न ई-18 एमआयडीसी- मिरजोळे- रत्नागिरी) यांचा संशयित हा मुलगा तर आदिती सून आहे. मुलगा व सून यांनी वडिलांच्या अपरोक्ष घरातील कपाटामध्ये ठेवलेला सोन्याचा हार नेला व नकली हार कपाटामध्ये आणून ठेवला होता. त्यानंतर 21 जून 2017 ला सकाळी अकराच्या सुमारास संशयितांनी आई अर्चना अनंत भोसले यांना अडचणीत आहोत धंद्याकरिता व्यापाऱ्याला पैसे द्यावयाचे आहेत.

तुझे दागिने गहाण ठेवून पैसे काढतो व धंदा सुरू करतो. दोन महिन्यांमध्ये दागिने सोडवून देतो असे सांगितले. मातेने अंगावरील सोन्याचे दागिने मुलाला काढून दिले. ते 15 दिलसात परत दिले .मात्र ते बनावट होते. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर 2 लाख 68 हजार 500 रुपयांची फसवणूक केल्याची तक्रार केली. यामध्ये 42 हजारचा 28 ग्रॅम 500 मिली सोन्याचा हार, 72 हजाराचे 48 ग्रॅमचे मंगळसूत्र, 60 हजाराच्या 40 ग्रॅमच्या सोन्याच्या पाटल्या, 72 हजाराच्या 48 ग्रॅमच्या चार बांगड्या,15 हजाराचे सोन्याचे लहान मंगळसूत्र, 7 हजार 500 रुपयाचे कानातील कुडी आदींचा समावेश आहे. 

सोन्याच्या दागिन्यांबाबत आईने विचारणा केली त्यावेळी दोघा संशयितांनी त्यांचा लहान मुलगा आर्यन (वय 5) त्याला विष देवून मारण्याची धमकी दिली. मुलाच्या या धमक्‍यांना कंटाळून निवृत्त पोलिस अनंत भोसले यांनी मंगळवारी (ता.16) रात्री ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरून पोलिसांनी फसवणूक केल्याप्रकरणी संशयितांवर गुन्हा दाखल केला. तपास पोलिस हेड कॉन्स्टेबल इंदुलकर करत होते. तपासात पोलिसांनी संशयितांस गुरुवारी (ता. 18) साडेचारच्या सुमारास अटक केली. आज त्याना न्यायालयात हजर केले असताना न्यायालयाने मंगळवारी (ता. 23) पर्यत पोलिस कोठडी सुनावली आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: retired police child cheating case keeping fake ornament