Rewas Reddi Coastal Highway latest news
esakal
अलिबाग : बहुप्रतीक्षित रेवस-रेड्डी सागरी महामार्गावरील रेवदंडा खाडीपुलाच्या उभारणीच्या कामाला वेग आला (Revdanda Creek Bridge) असून, कोकण किनारपट्टीच्या दळणवळण व्यवस्थेत मोठा बदल घडवून आणणाऱ्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या (एमएसआरडीसी) माध्यमातून अशोका बिल्डकॉन लिमिटेडकडून पुलाचे बांधकाम करण्यात येत असून, या प्रकल्पासाठी सुमारे एक हजार २०० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.