तिलारी घाटात रस्ता गेला वाहून

प्रभाकर धुरी
शुक्रवार, 5 जुलै 2019

दोडामार्ग - सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसामुळे तिलारी घाटातील रस्ता वाहून गेला आहे. रस्त्याचा बहुतांश भाग वाहून गेला आहे .केवळ अडीच मीटर रस्ता शिल्लक उरला आहे. पावसाचा जोर कायम राहिल्यास उर्वरित रस्ताही वाहून जाण्याची भीती आहे.

गोवा, महाराष्ट्र आणि कर्नाटक ही तीन राज्ये या रस्त्यामुळे एकमेकांशी जोडली जातात. गोवा, बेळगाव, कोल्हापूर, सिंधुदुर्ग जिल्ह्यांना जोडणारा हा आंतरराज्य मार्ग तिलारी घाटातून जातो. या मार्गावर रस्ता खचल्याने व काही भाग वाहून गेल्याने सध्या तरी या मार्गावर एकेरी वाहतूक सुरू आहे. पण अपघाताची शक्यता वाढली आहे.

घाटातून प्रवास करताना वाहनचालकांना कसरत करावी लागत आहे. कोल्हापूर सार्वजनिक  बांधकाम विभागाने उपाययोजनेसाठी तत्काळ पावले उचलण्याची गरज आहे. तत्काळ  उपाययोजना न केल्यास घाटमार्ग बंद पडण्याचा अथवा दुर्घटना घडण्याचा  धोका आहे .

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: road damage in Tilari Ghat Sindhudurg