Anuskura Ghat
Anuskura Ghatesakal

Anuskura Ghat : अणुस्कुरा घाटमार्ग तब्बल 36 तासापासून बंद; मातीसोबत रस्त्यावर मोठ-मोठ्या दगडांचा खच

Anuskura Ghat : नागमोडी वळणांचा आणि उताराचा रस्ता असलेल्या अणुस्कुरा घाटमार्गातून सातत्याने वाहनांची वर्दळ असते.
Published on
Summary

मार्ग मोकळा करण्यासाठी काल सकाळपासून बांधकाम विभागातर्फे जोरदार प्रयत्न सुरू आहेत. जेसीबी आणि डंपरच्या मदतीने माती बाजूला करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

राजापूर : अणुस्कुरा घाटामध्ये (Anuskura Ghat) पडलेली दरड हटवून रस्ता वाहतुकीसाठी मोकळा करण्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून (Public Works Department) कसोशीने प्रयत्न सुरू आहेत. मात्र, मातीसोबत रस्त्यावर आलेले मोठमोठे दगड हटविण्यात अद्यापही यश आलेले नाही. त्यामुळे सलग दुसऱ्या दिवशीही अणुस्कुरा घाट रस्ता वाहतुकीसाठी बंद आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com