एक कोटी 14 लाखांचा दरोडाप्रकरणी 2 आरोपींना 6 वर्षांची सक्तमजुरी व दंड | Crime | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

court
एक कोटी 14 लाखांचा दरोडाप्रकरणी 2 आरोपींना 6 वर्षांची सक्तमजुरी व दंड

एक कोटी 14 लाखांचा दरोडाप्रकरणी 2 आरोपींना 6 वर्षांची सक्तमजुरी व दंड

sakal_logo
By
अमित गवळे

पाली - सुधागड तालुक्यातील धोंडसे गावाच्या हद्दीत दळवी फार्महाऊस येथे 15 मार्च 2016 रोजी सायंकाळी सहाच्या सुमारास 6 जणांनी दरोडा टाकला होता. या दरोड्यात एक कोटी 14 लाखांची रोख रक्कम व मुद्देमाल चोरण्यात आला होता. यातील 2 आरोपींना माणगाव सत्र न्यायालयाने शुक्रवारी (ता.19) 6 वर्षांची सक्तमजुरी व दंड ठोठावला आहे. या प्रकरणात माणगाव येथील सहाय्यक सरकारी अभियोक्ता ऍड. जितेंद्र म्हात्रे यांनी युक्तिवाद केला.

या घटनेची सविस्तर हकीकत अशी की यातील फिर्यादी रमेश भिकमचंद परमार व इतर चार व्यापारी यांच्याकडे आरोपी नंबर एक विनोद विष्णू गुडेकर व इतर 8 आरोपींपैकी आरोपी हरिश्‍चंद्र गुडेकर याने सोन्याची देवाण-घेवाण करण्याचा व्यवहार करण्यासाठी व सोन्याचे बदल्यात रोख रक्कम देण्याचे ठरवले होते. त्यानंतर आरोपींनी आपसात कट रचून रमेश भिकमचंद परमार व साक्षीदार हे सोन्याच्या खरेदीसाठी आले असता त्यांना या आरोपींनी घातक शस्त्राने मारहाण करून गंभीर व साध्या दुखापती केल्या. तसेच पिस्तुलाचा धाक दाखवून त्यांचे हात पाय रस्सीने बांधून त्यांच्याकडील रोख रक्कम एक कोटी 14 लाख रुपये व सोन्याची चैन, हातातील घड्याळ व मोबाईल फोन गाड्यांच्या चाव्या काढून रूम मध्ये बंद करून दरोडा टाकला होता.

हेही वाचा: पोलीस बळाचा वापर करणाऱ्यांना किंमत मोजावी लागेल ; राणेंचा इशारा

या घटनेची फिर्याद पाली पोलिसांनी घेतली. गुन्हा दाखल केला. या गुन्ह्याचा तपास पाली पोलीस स्थानकाचे तत्कालीन पोलीस निरीक्षक अशोक पवार यांनी केला व आरोपींविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. सदर खटल्याची सुनावणी सत्र न्यायालय माणगाव, रायगड येथे झाली. या खटल्यामध्ये सहा. सरकारी वकील जितेंद्र म्हात्रे यांनी सरकार पक्षाच्या वतीने साक्षीदार तपासले व न्यायालयासमोर प्रभावीपणे युक्तिवाद केला. तसेच सदर काम करत असताना पोलीस सब. इन्स्पेक्टर यू. एल. धुमास्कर, पोलीस हवालदार छाया कोपनर, शशिकांत कासार व शशिकांत गोविलकर, पोलीस शिपाई सुनील गोळे व शिपाई सोमनाथ ढाकणे यांनी मदत केली. अभियोग पक्षाने कोर्टासमोर प्रभावीपणे केलेला युक्तिवाद व साक्षी पुराव्यावरून गुन्हा सिद्ध झाल्यानंतर माणगाव सत्र न्यायालयाचे न्यायाधीश एन. एस कोले यांनी आरोपी एक विनोद विष्णू गुडेकर व संतोष तुकाराम महाडिक यांस दोषी ठरवून भादवि कलम 395 अन्वये सहा वर्षे सक्तमजुरी व पाच हजार रुपये दंड व दंड न भरल्यास तीन महिने साधी कैद अशी शिक्षा सुनावली व उर्वरित आरोपींना निर्दोष मुक्त केले.

loading image
go to top