esakal | बंद गाडीच्या काचा फोडून भामट्याकडून अडीच लाखांच्या दागिन्यांवर डल्ला
sakal

बोलून बातमी शोधा

robbery in ratnagiri two and half kg gold theft from thefer from close car in ratnagiri

सायंकाळी त्या पती व मुलांसह त्यांच्या मालकीच्या कार मधून रत्नागिरीतून कणकवलीकडे निघाल्या होत्या.

बंद गाडीच्या काचा फोडून भामट्याकडून अडीच लाखांच्या दागिन्यांवर डल्ला

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

लांजा (रत्नागिरी) : तालुक्‍यातील कुवे येथील हॉटेलमध्ये जेवण्यासाठी गेलेल्या प्रवाशांच्या पार्क करून ठेवलेल्या गाडीतून दोन लाख 42 हजार रुपये दागिने अज्ञात चोरट्याने मागची काच फोडुन चोरून नेल्याचा प्रकार घडला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तरंदळे फाटा येथील रतन डोईफोडे या आपल्या कुटुंबासह मुंबई गोवा महामार्गावरील लांजा जवळील कुवे येथे थांबल्या असता हा प्रकार घडला. 

याबाबत लांजा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रतन रामचंद्र डोईफोडे (वय 40 राहणार जाणवली, डोंगरे सावंत हाऊसिंग सोसायटी रूम नंबर 14 बिल्डींग नंबर 880 तरंदळेफाटा तालुका कणकवली, जिल्हा सिंधुदुर्ग) या रविवारी 11 जानेवारी रोजी त्यांचे रत्नागिरी येथील नातेवाईक पांडुरंग गंगाराम कोकरे यांच्याकडे कुटुंबीयांसमवेत गेल्या होत्या. सायंकाळी त्या पती व मुलांसह त्यांच्या मालकीच्या कार मधून रत्नागिरीतून कणकवलीकडे निघाल्या होत्या.

हेही वाचा -  पराभूत उमेदवाराने चक्क रहदारीच्या रस्त्यावर चरी खोदून वाहतूक अडविली 

सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास लांजा येथे आले असता मुंबई-गोवा रोडवरील कुवे येथील हॉटेल प्रसाद येथे जेवणासाठी कुटुंब थांबले होते. यावेळी त्यांनी आपली गाडी हॉटेल समोर गाडी पार्क करून ठेवली होती. जेवण झाल्यावर 9 वाजण्याच्या दरम्यान हे कुटुंब बाहेर पडले. यावेळी त्यांना कारच्या ड्रायव्हरच्या मागील बाजूची काच फोडल्याचे लक्षात आले.

अज्ञात चोरट्याने कारमधील कारच्या सीटवर ठेवलेल्या पर्समधील 1 लाख 40 हजार रुपये किमतीचे व 35 ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र, 40 हजार रुपये किमतीचा एक दहा ग्रॅम वजनाचा सोन्याचा नेकलेस,12 हजार रुपये किमतीची कानातील सोन्याची रिंग जोड, 10 हजार रुपये किमतीचे 2.5 ग्रॅम वजनाची सोन्याची चैन असा एकूण 2 लाख 42 हजार रुपयांचा ऐवज लंपास केला आहे. 

हेही वाचा - विनायक राउतांनी कोकणात बालवाडी तरी आणली का? 

या प्रकरणी लांजा पोलीस गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल गंभीर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुनील चवेकर करीत आहेत. याबाबत आज मंगळवारी अप्पर जिल्हा पोलीस अधिक्षक जयश्री देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी निवास साळोखे, लांजा पोलीस निरिक्षक अनिल गंभीर यांनी घटनास्थळी भेट देवून पाहणी केली.

संपादन - स्नेहल कदम 

loading image