

Live worms and pests found in ration rice
sakal
पाली : सुधागड तालुक्यातील वाघोशी विभागातील रास्त भाव धान्य दुकानातून मिळणाऱ्या धान्यात चक्क जिवंत अळ्या आणि उंदीर व पालीच्या लेंड्या सापडल्याने नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. वाघोशी विभागातील रास्त भाव धान्याचे दुकान कुंभारघर येथे आहे. या विभागात विशेषतः बहुतांश प्रमाणात आदिवासी वस्त्या आहेत. आणि या आदिवासी नागरिकांचे जगण्याचे एकमेव साधन म्हणजे शासनाकडून रास्तभाव धान्य दुकानावर मिळणार शिधा आहे.