esakal | सिंधुदुर्गात "आरटीपीसीआर'ची सक्ती नाही ः डाॅ. पाटील

बोलून बातमी शोधा

rtpcr test issue konkan sindhudurg

डॉ. पाटील यांनी आज दुपारी आपल्या दालनात पत्रकार परिषद घेतली. यावेळी डॉ. हर्षल जाधव, डॉ. श्‍याम पाटील, माहिती अधिकारी हेमंत चव्हाण उपस्थित होते. डॉ. पाटील म्हणाले, ""पूर्वी बाधित व्यक्तीच्या संपर्कातील चार ते पाच व्यक्तींचे नमूने घेत होतो.

सिंधुदुर्गात "आरटीपीसीआर'ची सक्ती नाही ः डाॅ. पाटील
sakal_logo
By
विनोद दळवी

ओरोस (सिंधुदुर्ग) - जिल्ह्यात येणाऱ्या नागरिकांना आरटीपीसीआर सक्तीची केलेली नाही; परंतु आरटीपीसीआर करून येण्याची विनंती केली आहे. ती केली नसल्यास प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय व जिल्हा रुग्णालयात ही सुविधा मोफत आहे, अशी माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिली. 

डॉ. पाटील यांनी आज दुपारी आपल्या दालनात पत्रकार परिषद घेतली. यावेळी डॉ. हर्षल जाधव, डॉ. श्‍याम पाटील, माहिती अधिकारी हेमंत चव्हाण उपस्थित होते. डॉ. पाटील म्हणाले, ""पूर्वी बाधित व्यक्तीच्या संपर्कातील चार ते पाच व्यक्तींचे नमूने घेत होतो. आता बाधित रुग्णाच्या संपर्कातील किमान आठ ते दहा व्यक्तीची चाचणी करीत आहोत. शासनाने व्यापारी, रिक्षा चालक, एसटी चालक, बॅंक कर्मचाऱ्यांना सुपर स्प्रेडर म्हणून घोषित केले आहे. त्या सर्वांची चाचणी करण्यात येत असल्याने जिल्ह्यातील चाचणी संख्या वाढली आहे. जिल्ह्यातील बाधितांची सरासरी सप्टेंबर, ऑक्‍टोबर 2020 या दोन महिन्यापेक्षा जास्त आहे. अर्थात त्यावेळी दिवसाला 600 कोरोना चाचणी करण्यात येत होत्या. आता दिवसाला 1200 चाचणी करण्यात येत आहेत.'' 

"ई-संजीवनी' ऍपचा लाभ घ्या 
डॉ. पाटील म्हणाले, ""जिल्ह्यातील नागरिकांनी साध्या आजारावर उपचार घेण्यासाठी घराबाहेर पडण्याची गरज नाही. यासाठी शासनाने ई-संजीवनी ऍप विकसित केले आहे. हे ऍप डाऊनलोड करून ऑनलाईन पद्धतीने कॉल केल्यास तुम्हाला उपचार सांगितले जातील. यासाठी डॉ. श्‍याम पाटील आदी ऑनलाईन सल्ला देतात. "आरोग्य सेतू' ऍपही वापरावा.'' 

स्वॅब कांडीचा व्हायरल व्हीडिओ 
स्वॅब कांडीचा पुर्नवापर झाल्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. याबाबत विचारले असता डॉ. पाटील म्हणाले, की आज सकाळीच हा व्हिडिओ पाहिला; मात्र अशाप्रकारच्या दोन कांड्या येतात. एकीचा पुर्नवापर होऊ शकतो. दुसरीचा नाही. व्हायरल झालेली कांडी ही शासनाच्या नियमानुसार स्वच्छ करून पुन्हा वापरली आहे; परंतु आम्ही अशी कांडी खरेदी न करण्याचा निर्णय घेतला आहे. 

संपादन - राहुल पाटील