...अन् मरणाच्या दारातून सुखरूप घरी परतलो; आकाशने सांगितली आपबिती

भिंगळोली येथील त्याचे निवासस्थानी त्याचे पालक, नातेवाईकांनी जंगी स्वागत केले.
...अन् मरणाच्या दारातून सुखरूप घरी परतलो; आकाशने सांगितली आपबिती

मंडणगड: युद्धाच्या पार्श्वभूमीवर वाजणारे सायरन भीतीची गडद छाया निर्माण करीत होते. युद्ध परिस्थितीत जीव वाचवत दहा दिवसांचा अतिशय प्रतिकूल परिस्थितीत प्रवास करून मरणाच्या दारातून सुखरूप घरी आल्याची भावना आकाश कोबनाक यांनी बोलताना व्यक्त केली. युक्रेन (Ukraine) येथील वैद्यकीय शिक्षण घेत असलेला आकाश अनंत कोबनाक (Akash Kobnak) आज (ता.५) मार्च रोजी मंडणगडमध्ये (Mandangad) पोहचला.

Summary

युद्ध परिस्थितीत जीव वाचवत दहा दिवसांचा अतिशय प्रतिकूल परिस्थितीत प्रवास करून मरणाच्या दारातून सुखरूप घरी आल्याची भावना आकाश कोबनाक यांनी व्यक्त केली.

भिंगळोली येथील त्याचे निवासस्थानी त्याचे पालक, नातेवाईकांनी जंगी स्वागत केले. युक्रेन येथे युध्दाला सुरुवात झाल्याने आकाशने आपल्या सहकारी मित्रासमेवत २५ फेब्रुवारी २०२२ रोजी मायदेशी परतीच्या प्रवासास सुरुवात केली होती. युक्रेन सिमेवर तीन दिवसांचा कालावधी गेल्यानंतर अखेर रुमानियात प्रवेश मिळाला. येथून भारत सरकारने व दुतावसाने प्रवास व निवासाने दिल्ली येथे जाण्यासाठी विमान उपलब्ध करुन व पुढे राज्यशासाने दिल्लीतून मुंबईला व आज सुखरुप घरी आणुन सोडल्याचे आकाशने पत्रकारांना सांगीतले.

...अन् मरणाच्या दारातून सुखरूप घरी परतलो; आकाशने सांगितली आपबिती
सुमीत अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना सरकारचा महत्त्वाचा सल्ला म्हणाले...

युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांनी सुखरुप मायदेशी परत आणण्यासाठी सुरु केलेल्या ऑपरेशन मिशन गंगाचे आकाशने यावेळी कौतूक केले व केंद्र व राज्यशासनाचे आभर मानले. अद्याप काही भारतीय विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकलेले आहेत. त्यांनाही परत आणण्यासाठी शासनाने प्रयत्न करावेत अशी अपेक्षा व्यक्त केले. पालक अनंत कोबनाक यांनी केंद्र व राज्यशासनानेच या निमीत्ताने आभार मानले असून अतिशय भितीचे वातावरणात व जीवीताचे भय असताना केंद्रशासनाने केलेली मदत व आपला पाल्य घरी आल्याने झालेला आनंद शब्दात वर्णन करता येणार नसल्याचे यावेळी सांगीतले. प्रशासनाने या काळात पालकांशी संपर्क साधत वांरवार धीर दिला व ख्याली खुशाली सांगत समन्वय साधल्याचे सांगतीले.

परिवार नातेवाईक व तालुकावासीयांच्या आमच्या कुटुंबियांचे प्रति असलेल्या सदिच्छामुळे आकाश मायदेशी आपल्या घरी सुखरुप आलेला असल्याचे यावेळी सांगीतले. दरम्यान आकाश रहात असलेल्या भिंगळोली येथील सेंटर पार्क सोसायटीचेवतीने आकाशचे औक्षण व पुष्प वर्षाव करुन व फटाके वाजवून स्वागत करण्यात आले. या स्वागतामुळे आपण भारावून गेलेलो असल्याचे आकाशने सांगीतले.

मंडगडचे तहसिलदार नारायण वेगुर्लेकर, निवासी नायब तहसिलदार दत्तात्रय बेर्डे व कर्मचाऱ्यांनी आकाशचे घरी जावून पुष्पगुच्छ देवून स्वागत केले. सेंटर पार्कने आयोजीत केलेल्या स्वागत समारंभास अध्यक्ष सादीकअली वलेले, तौफिक कडवेकर, कुमार अष्टमकर, दिनेश झोरे, निळकंठ राठोड, कांतु चव्हाण, दिलीप मराठे, शांताराम पवार, भगवान बागूल, रुपेश मर्चंडे, दिपक महाजन, विश्वदास लोखंडे, काजल लोखंडे, राजेश नगरकर, भाई पोस्टुरे, संतोष गोवळे, प्रकाश शिगवण, नितीन म्हामुनकर, संदेश चिले, प्रणाली चिले, राकेश साळुंखे, हरेश मर्चंडे व शिक्षक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com