esakal | घारपी घाटात एस टी कोसळून ११ प्रवासी जखमीं ; बांदा, सावंतवाडीत उपचार सुरू
sakal

बोलून बातमी शोधा

s t bus accident Gharpi Ghat sindhudurg

दैनंदिनी फेरी असलेली एस टी  घारपीहून सकाळी बांद्याच्या दिशेने प्रवाशांना घेवून निघाली होती.

घारपी घाटात एस टी कोसळून ११ प्रवासी जखमीं ; बांदा, सावंतवाडीत उपचार सुरू

sakal_logo
By
महेश चव्हाण

ओटवणे (सिंधुदुर्ग) : घारपी-बांदा ही एसटी घारपी घाटात कोसळून मंगळवारी सकाळी अपघात झाला.  या दुर्घटनेत घारपी असनिये तील विद्यार्थ्यांसह काही प्रवासी जखमी झाले. बस ज्या स्थितीत कोसळली ती स्थिति पाहता अपघात मोठा होता. मात्र दैव बलवत्तर  म्हणून कुणालाही गंभीर दुखापत झाली नाही.अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांनी तेथे धाव घेतली आणि प्रवाशांना बाहेर काढले.

या जखमींना खाजगी वाहनांनी  बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले. तर यातील काही जखमींना सावंतवाड़ी कुटीर रुग्णालयात दाखल करण्यात आले.
दैनंदिनी फेरी असलेली एस टी  घारपीहून सकाळी बांद्याच्या दिशेने प्रवाशांना घेवून निघाली होती. तीव्र उतारावर अचानक ब्रेक फेल झाल्याने चालकाचा गाडीवरील ताबा सुटला व गाडी दरीत खोल कोसळली. या बसमध्ये विद्यार्थ्यांसह ११ प्रवासी होते. जखमी विद्यार्थ्यांवर बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात तसेच सावंतवाड़ी कुटीर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. 

हेही वाचा- बंडखोर साळवींची कणकवलीची दादागिरी चालू देणार नाही -


जखमी मध्ये विजया गजानन गावडे,राज देवीदास गांवकर,गजानन विठ्ठल गावडे, सेजल संजय गावडे,सोनाली विजय कविटकर,निति गजानन गावडे,साक्षी सुभाष सावंत,सरिता वासुदेव नाईक,कौस्तुभ संजय गावडे,तेजस्विनी संजय गावडे,महेश वासुदेव नाइक,दीप्ति देवीदास गांवकर यांचा समावेश आहे.अपघाताची माहिती मिळताच  जि. प. सदस्या श्वेता कोरगावकर, उपसभापती शीतल राऊळ, असनिये सरपंच गजानन सावंत यांनी बांदा आरोग्य केंद्रात भेट देत जखमींची विचारपूस केली.

संपादन- अर्चना बनगे


 

loading image