esakal | साडवली : चाकरमान्यांच्या परतीसाठी देवरुख आगाराच्या जादा गाड्या
sakal

बोलून बातमी शोधा

st

साडवली : चाकरमान्यांच्या परतीसाठी देवरुख आगाराच्या जादा गाड्या

sakal_logo
By
प्रमोद हर्डीकर

साडवली : गणेशोत्सवासाठी कोकणात येण्यासाठी चाकरमान्यांनी ए.टी.ला प्राधान्य दिले.देवरुख एस.टी.आगाराने चाकरमान्यांसाठी जादा बसेसचे योग्य नियोजन केले.१४ तारखेपासुन चाकरमान्यांच्या परतीसाठी ५८ जादा फेर्‍या व २१ गाड्यांचे ग्रुप बुकींग झाल्याची माहीती आगारप्रमुख सागर गाढे यांनी दिली.

देवरुख,साखरपा,संगमेश्वर,माखजन आदी भागात जादा गाड्यांनी चाकरमानी आले व परतीच्या प्रवासही जादा गाड्यानी सुरु झाला.गावागावात ग्रुप बुकींग करुनही प्रवाशांनी एस.टी.सहकार्य केले.रेल्वेने येणार्‍या व जाणार्‍या चाकरमान्यांच्या सेवेसाठी देवरुख,साखरपा येथुन रेल्वे कनेक्शन बसफेर्‍या सोडण्यात आल्या.गौरी,गणपतींचे १४ तारखेला विसर्जन झाल्यावर चाकरमानी परतीच्या प्रवासाला लागले.या चाकरमान्यांसाठी

हेही वाचा: मोठी बातमी! पाकच्या दहशतवादी मॉड्यूलचा भांडाफोड; देशभरात करणार होते घातपात

१४ पासुन ५८ जादा बसेस सोडण्यात येणार आहेत.तसेच २१ बसेसचे ग्रुपबुकींग झाले आहे.गणेशोत्सवासाठी बाहेरील ७९ जादा बसेस देवरुख आगारासाठी उपलब्ध झाल्या होत्या.यासाठी चालक,वाहकही त्या त्या आगाराने उपलब्ध करुन दिले होते.

गणेशोत्सवासाठी देवरुख आगारातील चालक,वाहक,तांञिक कर्मचारी,कार्यालयीन कर्मचारी यांनी चाकरमान्यांच्या सेवेसाठी योगदान दिले.१४ तारखेला मुंबई,पुणे,कल्याण,बोरीवली अशा जादा व नियमित गाड्या सोडण्यात आल्या.

loading image
go to top