esakal | खेडच्या भूमीवर पाय ठेवला अन्‌ ; 'तीला' जग जिंकल्याचा आनंद झाला...
sakal

बोलून बातमी शोधा

sadia mujawar return in india ratanagir kokan marathi news

नॅनथाँग युनिव्हर्सिटीत अडकून पडलेली, वैद्यकीय शिक्षण घेणारी खेड तालुक्‍यातील सादीया मुजावर ही विद्यार्थिनी सुखरूप घरी परतली.

खेडच्या भूमीवर पाय ठेवला अन्‌ ; 'तीला' जग जिंकल्याचा आनंद झाला...

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

खेड (रत्नागिरी) : कोरोनाने थैमान घातलेल्या चीनच्या भूमीवरून सुटले. खेडच्या जमिनीवर पाय ठेवला आणि मला जग जिंकल्याचा आनंद झाला. एसटी स्टॅंडवर आई-वडिलांना पाहिले आणि मला आनंदाश्रू आवरणे कठीण झाले, अशी भावोत्कट प्रतिक्रिया येथे परतलेल्या सादिया मुजावर हिने दिली. 

हेही वाचा-  कोकण कृषी विद्यापीठात तब्बल एवढे विद्यार्थी घेणार पदवी...
नॅनथाँग युनिव्हर्सिटीत अडकून पडलेली, वैद्यकीय शिक्षण घेणारी खेड तालुक्‍यातील सादीया मुजावर ही विद्यार्थिनी सुखरूप घरी परतली. त्यानंतर तिने भावनांना वाट मोकळी करून दिली. उर्वरित वैद्यकीय शिक्षण कुठे पूर्ण करणार असे विचारले असता, ती म्हणाली, ‘उर्वरित वैद्यकीय शिक्षण मी त्याच युनिव्हर्सिटीत पूर्ण करणार.

हेही वाचा- माझ्याशी लग्न नाही केलं तर...

मी पुन्हा चीनला रवाना होईन.​

चीनमध्ये पसरलेला कोरोना लवकरच हद्दपार होईल हा माझा विश्‍वास आहे. युनिव्हर्सिटीकडून आम्हाला कळविले जाईल आणि मी पुन्हा चीनला रवाना होईन. कोरोना पसरत असल्याचे समजल्यानंतर आम्ही घाबरलो. रत्नागिरीच्या जिल्हाधिकाऱ्यांनी मला फोन केल्यानंतर हिंदुस्थानात पोहचू हा विश्‍वास निर्माण झाला.’

loading image