२०१८ मध्ये जेव्हा पहिल्यांदा जीआय जाहीर झाला त्यावेळी देवगड हापूस आणि रत्नागिरी हापूस असे दोन स्वतंत्र जीआय जाहीर झाले होते.
देवगड : अस्सल देवगड हापूस आंबा (Devgad Hapus Mango) खरेदीदार ग्राहकांची होणारी संभाव्य फसवणूक टाळण्यासाठी आणि देवगड हापूसचा दर्जा अबाधित राखण्यासाठी आता प्रत्येक हापूस आंब्याला युनिक कोड देण्याचा निर्णय देवगड तालुका आंबा उत्पादक सहकारी संस्थेने (Devgad Taluka Mango Producers Cooperative Society) घेतला आहे. जामसंडे येथे झालेल्या चर्चासत्रात आंबा बागायतदार शेतकऱ्यांच्या मागणीनुसार हा निर्णय घेण्यात आला आहे.