esakal | पगार अनियमित; पिळवणूक अधिक
sakal

बोलून बातमी शोधा

ratnagiri

Ratnagiri : पगार अनियमित; पिळवणूक अधिक

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

रत्नागिरी : जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या अति महत्त्वाच्या असणाऱ्या रुग्णवाहिकेच्या चालकांची पिळवणूक होत आहे. एका खासगी कंपनीचे कंत्राटी १०२ चालक कार्यरत आहेत. कारण चालकांचे मूळ वेतन १७ ते १९ हजार रुपये आहे. पण हातात फक्त ६ ते ७ हजार रुपयेच मिळतात. हा पगारही वेळेवर मिळत नाही. त्यामुळे कंत्राटदार कंपनी काळ्या यादीत टाका. या संदर्भात चालकांनीही तक्रार दिली आहे. परंतु पुढील आठवड्यात जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन तातडीची बैठक घेण्याची मागणी करावी, अशी मागणी भारतीय जनता युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष अनिकेत पटवर्धन यांनी केली आहे. कामगार अधिकाऱ्यांची भेट घेणार असल्याचे ते म्हणाले.

या संदर्भात त्यांनी दिलेल्या पत्रात म्हटले आहे, १०२ कंत्राटी वाहनचालक ग्रामीण रुग्णालये, उपजिल्हा रुग्णालये व जिल्हा रुग्णालये यावरील १०२ रुग्णवाहिकांवर गेली ७ ते १५ वर्षे प्रामाणिकपणे, तप्तरतेने व सेवाभावी वृत्तीने २४ तास सेवा बजावत आहेत. कंत्राटी भरती प्रक्रियेमुळे त्यांना मिळणारे वेतन आजच्या महागाईचा विचार करता व कामाचे स्वरूप पाहता फारच अत्यल्प आहे. शासनाकडून कंत्राटी कंपन्यांना प्रत्येकी १७ ते १९ हजार रुपये वेतन दिले जाते. परंतु कंत्राटी कंपनी अशकॉम इंडिया, डीएम व इतर कंपन्या या जिल्ह्यामध्ये कार्यरत आहेत. या कंपन्या वाहनचालकांना फक्त ७२०० रुपये ते ८९०० रुपये इतका कमी पगार देते.

पगारासाठी ३-४ महिने प्रतीक्षा

कंपन्या चालकांची भरती करताना कामाचे तास, कामाची वेळ, मिळणाऱ्या सुट्ट्या, वेतन याबाबत कोणताही खुलासा करत नाही; मात्र, या चालकांना कमी पगारावर २४ तास राबवून घेतले जाते. शासनाचे आदेश असतानाही या खासगी कंपन्या ईपीएफ, चालकांना लागणारे ड्रेसकोड, ओळखपत्र इत्यादी आवश्यक सेवा पुरवत नाहीत. पगारासाठी ३-४ महिने वाट पाहावी लागते.

तर काम बंद आंदोलन

शासनाने कंत्राटी वाहनचालकांच्याच खात्यात थेट वेतन दरमहा पूर्ण रक्कमेचे करावे. याबाबत महिन्याभरात दखल न घेतल्यास सर्व वाहनचालकांना काम बंद आंदोलन अथवा सामूहिक राजीनामे या पर्यायांचा मार्ग स्वीकारावा लागेल, असेही वाहनचालकांनी सांगितल्याचे अनिकेत पटवर्धन म्हणाले.

एक नजर

  1. खासगी कंपनीचे कंत्राटी चालक कार्यरत १०२

  2. चालकांचे मूळ वेतन १७ ते १९ हजार

  3. हातात मिळतात फक्त ६ ते ७ हजार

loading image
go to top