नीलेश राणेंना ‘समाजरत्न’ पुरस्कार

नीलेश राणेंना ‘समाजरत्न’ पुरस्कार

89171

नीलेश राणेंना ‘समाजरत्न’ पुरस्कार

सावंतवाडीत सन्मान ः सकल मराठा समाजाचा पुढाकार

सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. १० ः मराठा समाजाच्या अडचणीच्या वेळी नेहमी धावून येणारे समाजाचे लढवय्ये नेते व सावंतवाडी सकल मराठा समाजाला सर्वतोपरी मदत करणारे माजी खासदार नीलेश राणे यांचा आज शाल, श्रीफळ व समाजरत्न पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. माजी पंचायत समिती सदस्य केसरी गावचे मानकरी शिवसेना तालुका संघटक व मराठा समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक राघोजी सावंत यांच्या हस्ते श्री. राणे यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी सर्वप्रथम मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण मिळवून दिले. या लढाईत नारायण राणे यांचे संपूर्ण कुटुंब मराठा समाजाबरोबर होते, हे मराठा समाज कधीही विसरणार नाही, असे समाजाचे अध्यक्ष सीताराम गावडे यांनी स्पष्ट केले. जेव्हा जातीवाचक प्रकरणात मराठा समाजाला गुंतवण्याचा प्रयत्न झाला, त्यावेळी नीलेश राणे समाजाच्या खंबीरपणे पाठिशी राहिले. त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना चुकीचे काही करू नका, जर आमचा मराठा खरंच दोषी असेल, तर तुम्ही निश्चित कारवाई करा; मात्र चुकीचे काही झाल्यास आम्ही शांत बसणार नाही, असा समाजाच्या वतीने इशारा दिला होता. त्यामुळे नीलेश राणे यांच्याकडे मराठा समाजाचा एक आधारवड म्हणून पाहिले जाते. याबाबत त्यांचा सावंतवाडी येथे आयोजित दहावी, बारावीतील यशस्वी विद्यार्थ्यांच्या गुणगौरव समारंभावेळी समाजरत्न पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.
यावेळी माजी खासदार राणे यांनी, आपला हा सत्कार एका ज्येष्ठ मराठा समाजाच्या सदस्यामार्फत होत असल्याने मला त्याचा आनंद आहे. भविष्यात मराठा समाजासाठी लागेल ती मदत करायला मी सदैव तत्पर असेन, असे उपस्थितांना आश्वासित केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com