
महाड : रायगडावर सुरू असलेल्या जतन व संवर्धनाच्या कामांमध्ये येणाऱ्या विविध अडचणींबाबत रायगड विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष संभाजीराजे छत्रपती यांनी केंद्रीय सांस्कृतिकमंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांची दिल्ली येथे भेट घेतली. या बैठकीत सकारात्मक चर्चा झाल्याने नजीकच्या काळात रायगड संवर्धनाच्या कामाला वेग मिळणार आहे.