कुणबी समाजाचे आरक्षण न घेता मराठ्यांसाठी स्वतंत्र आरक्षण घेणे गरजेचे; आनंदराज आंबेडकरांचा महत्त्वाचा सल्ला

भारतीय राज्यघटना टिकवण्यासाठी सर्वांनी एकत्रित आले पाहिजे.
Republican Sena President Anandraj Ambedkar
Republican Sena President Anandraj Ambedkaresakal
Summary

मराठा समाजासाठी आरक्षण मागताना कुणबी समाजाचे आरक्षण न घेता मराठा समाजासाठी स्वतंत्र आरक्षण घेणे गरजेचे आहे.

रत्नागिरी : भारतीय राज्यघटनेने या देशाला स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्यायाच्या विचार सूत्रात गुंतून समृद्धीच्या उंच शिखरावर नेले आहे. तेच संविधान बदलण्याची भाषा आज केली जात आहे. हा धोका ओळखून समाजातील सर्व जातीधर्मातील नागरिकांनी संविधानवादी, विवेकवादी विचारसरणीच्या सर्वांनी एकत्र येऊन संविधानिक समतामुलुख समाजव्यवस्था निर्माण करण्यासाठी जागरूकतेने एकसंध होऊन लढा उभारण्याची गरज आहे, असे प्रतिपादन डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नातू, इंदूमिल आंदोलनाचे प्रणेते आणि रिपब्लिकन सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष आनंदराज आंबेडकर (Anandraj Ambedkar) यांनी केले.

Republican Sena President Anandraj Ambedkar
Prakash Ambedkar : 'हिटलरने ज्यू लोकांसोबत जे केलं, तेच RSS तुमच्या सोबत करेल'; प्रकाश आंबेडकरांचा गौप्यस्फोट

रत्नागिरी शहरातील पॉलिटेक्निक कॉलेजजवळच्या कार्लेकर मळा येथील बौद्धजन पंचायत समितीच्या मैदानात संविधान बचावयात्रेचे स्वागत बुधवारी सायंकाळी उत्साहात करण्यात आले. या वेळी महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष समाजभूषण काकासाहेब खंबाळकर, तालुकाध्यक्ष प्रकाश पवार, उपाध्यक्ष विजय आयरे, चिटणीस सुहास कांबळे, उपचिटणीस नरेंद्र आयरे, कोषाध्यक्ष मंगेश सावंत, माजी अध्यक्ष तु. गो. सावंत यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

Republican Sena President Anandraj Ambedkar
Belgaum : अधिवेशनाच्या तोंडावरच कन्नड संघटनांनी फाडले इंग्रजी-मराठी फलक; नेत्यांचं लक्ष वेधण्यासाठी कन्नडिगांची वळवळ सुरू

प्रारंभी येथील नवीन विहिरीचे उद्‌घाटन आनंदराज आंबेडकर यांच्या हस्ते करण्यात आले. ही विहीर बौद्धजन पंचायत समितीचे माजी अध्यक्ष तु. गो. सावंत गुरुजी आणि त्यांच्या कुटुंबीयांनी सुमारे साडेतीन लाख रुपयांच्या स्वखर्चाने बांधून दिली आहे.

Republican Sena President Anandraj Ambedkar
Republican Sena President Anandraj Ambedkaresakal

या प्रसंगी आनंदराज आंबेडकर म्हणाले, ‘भारतीय राज्यघटना टिकवण्यासाठी सर्वांनी एकत्रित आले पाहिजे. जे जे देशाच्या सर्वोच्च पदावर विराजमान झाले ते राज्यघटनेचे उपकार आहेत.’ काकासाहेब खंबाळकर म्हणाले, ‘देशात राज्यघटनेला धोका पोहोचवण्याचे काम केले जात आहे. देश वाचवायचा असेल तर ईव्हीएम मशिन ही नाकारली पाहिजेत. संविधान बचावयात्रेचा रथ त्यासाठीच आम्ही येथे आणला आहे. या रथयात्रेचे चांगल्याप्रकारे स्वागत केल्याबद्दल समता सैनिक दलाच्या सर्व टीमचे विशेष कौतुक आहे.’

Republican Sena President Anandraj Ambedkar
'शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांचा वारसा जपत आम्ही महायुतीत सहभागी झालो, तर आमचं काय चुकलं?'

स्वतंत्र आरक्षण घ्या

मराठा समाजासाठी आरक्षण मागताना कुणबी समाजाचे आरक्षण न घेता मराठा समाजासाठी स्वतंत्र आरक्षण घेणे गरजेचे आहे. तशाप्रकारे आमचीदेखील मागणी आहे. मराठा समाजाने याचा सारासार विचार करावा, असे आंबेडकर यांनी सुचित केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com