Former MLA Vaibhav Naik
esakal
कुडाळ : मुंबई-गोवा महामार्गाचे काम निकृष्ट दर्जाचे झाले असून, महामार्ग खड्डेमय झाला आहे. त्यामुळे अनेकांचे बळी गेले आहेत. त्याची जबाबदारी ठेकेदार, महामार्ग अधिकारी, सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांनी घ्यावी. माजी आमदार वैभव नाईक यांच्यावर जो अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला आहे, तो मागे घ्यावा आणि त्या अधिकाऱ्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी ठाकरे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांनी पत्रकार परिषदेत केली.