esakal | भाजप जिल्हाध्यक्षपदी संध्या तेरसे यांची निवड 
sakal

बोलून बातमी शोधा

Sandhya Terase As BJP District President Sindhudurg Marathi News

''पक्षाने माझ्यावर जिल्हा महिलापदाची मोठी जबाबदारी दिली आहे. पक्ष संघटना अधिक मजबूत करण्याच्या दृष्टीने ग्रामीण भागात सर्वांना सोबत घेऊन काम करणार. आगामी सर्व निवडणुकामध्ये भाजप पक्ष आघाडीवर कसा राहील ? यासाठी मी कार्यरत राहीन.'' 

- संध्या तेरसे

भाजप जिल्हाध्यक्षपदी संध्या तेरसे यांची निवड 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कुडाळ ( सिंधुदुर्ग) - आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या पूर्वसंध्येला येथील नगरपंचायत नगसेविका व माजी आरोग्य सभापती संध्या तेरसे यांची भारतीय जनता पक्षाच्या महिला जिल्हा अध्यक्षपदी निवड केली आहे. जिल्ह्यात महिला संघटना वाढविताना सर्वांना सोबत घेऊन काम करणार, असे त्यांनी सांगितले. 

जिल्ह्याच्या दुसऱ्या टप्यातील जिल्हा कार्यकारिणी भाजप नूतन जिल्हाध्यक्ष माजी आमदार राजन तेली यांनी जाहीर केली आहे. कार्यकारिणी अशी महिला आघाडी अध्यक्षपदी संध्या तेरसे, युवा मोर्चा अध्यक्षपदी भाई सावंत, उपाध्यक्ष रामचंद्र ऊर्फ बाळ खडपे, चिटणीस भालचंद्र साठे, संजय वेंगुर्लेकर, संतोष नानचे, सोशल मीडिया प्रमुख अविनाश पराडकर, कार्यकारिणी सदस्य कणकवली राजश्री धुमाळे, प्रणिता पाताडे, संजना सावंत, देवगड प्रियांका साळसकर, संजीवनी बांबुळकर, आरिफ बगदादी, संजय बोबडी, संदीप साटम, रवींद्र जोगल, मालवण भाऊ सामंत, सुदेश आचरेकर, जेरोन फर्नांडिस, पराशर ऊर्फ सनी कुडाळकर, भालचंद्र ऊर्फ बाळू कोळंबकर, रश्‍मी लुडबे, नीलिमा सावंत वैभववाडी राजेंद्र राणे, सीमा नानिवडेकर, दिलीप रावराणे, अरविंद रावराणे, जयेंद्र रावराणे, प्राची तावडे-चोरगे, स्नेहलता चोरगे, वेंगुर्ले साईप्रसाद नाईक, ऍड. सुषमा खानोलकर, वसंत तांडेल, मनीष दळवी, विष्णूदास ऊर्फ दादा कुबल, दोडामार्ग स्मिता आठलेकर, रंगनाथ गवस, सुधीर दळवी, राजेंद्र दळवी, विलास सावंत, सावंतवाडी आत्माराम पालयेकर, कृष्णा कविटकर, निशांत तोरसकर, गुरुनाथ पेडणेकर, रेश्‍मा सावंत, ऍड. अनिल निरवडेकर. कुडाळ अस्मिता बांदेकर, प्रकाश मोर्ये, मोहन सावंत, ऍड. विवेक ऊर्फ बंड्या मांडकुलकर, निलेश तेंडोलकर, लॉरेन्स मान्येकर यांचा समावेश आहे. 

''पक्षाने माझ्यावर जिल्हा महिलापदाची मोठी जबाबदारी दिली आहे. पक्ष संघटना अधिक मजबूत करण्याच्या दृष्टीने ग्रामीण भागात सर्वांना सोबत घेऊन काम करणार. आगामी सर्व निवडणुकामध्ये भाजप पक्ष आघाडीवर कसा राहील ? यासाठी मी कार्यरत राहीन.'' 

- संध्या तेरसे