Sangameshwar Gaur Rescue
esakal
संगमेश्वर : संगमेश्वर तालुक्यातील लोवले येथील संतोष प्रदीप खेडेकर यांच्या कोरड्या विहिरीमध्ये पाच गवे पडल्याची घटना बुधवारी (ता. ११) रात्री साडेअकराच्या सुमारास (Sangameshwar Gaur Rescue) घडली. वन विभागाला याची माहिती मिळताच घटनास्थळी जाऊन गव्यांना बाहेर काढण्यासाठी वनाधिकाऱ्यांनी रेस्क्यू ऑपरेशन केले. जेसीबीने रस्ता तयार करून पाचही गव्यांना सुरक्षित नैसर्गिक अधिवासात सोडले.