

Sangameshwar News
esakal
संगमेश्वर : गणेशोत्सवाचा आनंद साजरा करण्यासाठी मुंबईहून गावी आलेल्या इंजिनिअर तरुणाचा खाडीत बुडून मृत्यू झाला. अथर्व राजेश देसाई (वय २२) असे त्याचे नाव आहे. मेढे मांजरेजवळील जांभळी बंदरात पोहता येत नसतानाही ओहोटीच्या प्रवाहात उडी मारल्यामुळे ही घटना घडली. एनडीआरएफच्या पथकाने त्याचा मृतदेह मंगळवारी सायंकाळी शोधून काढला. अथर्व नुकताच इंजिनिअर झाला होता.