esakal | NCP काँग्रेसला मदत करणार? BJP ‘ताकही फुंकून पिणार’
sakal

बोलून बातमी शोधा

NCP काँग्रेसला मदत करणार? BJP ‘ताकही फुंकून पिणार’

NCP काँग्रेसला मदत करणार? BJP ‘ताकही फुंकून पिणार’

sakal_logo
By
बलराज पवार

सांगली : महापौर, उपमहापौर निवडणूकीतील ‘दे धक्का’मुळे स्थायी सभापती निवडीसाठी भाजपने सावध पवित्रा घेतला आहे. सभापती निवडीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर आजच भाजपने आपल्या सर्व नऊ सदस्यांना एकत्रित सहलीला रवाना केले आहे. विरोधी काँग्रेस-राष्ट्रवादीनेही हालचाली सुरु केल्या आहेत. त्यामुळे सभापती निवड अजून पाच दिवस लांब असली तरी त्याची उत्सुकता वाढू लागली आहे.

महापालिकेच्या स्थायी समिती सभापतीची निवड नऊ सप्टेंबरला होणार आहे.त्याचा कार्यक्रम आज जाहीर झाला. पाठोपाठ घडामोडींनी गती घेतली आहे. सहा महिन्यांपुर्वी महापौर, उपमहापौर निवडणुकीत बहुमत असूनही भाजपला सत्ता गमवण्याची वेळ आली. त्यावेळी सहा सदस्य फुटले. त्यामुळे स्थायी समितीवरील वर्चस्व गमवावे लागू नये यासाठी भाजपने चांगलीच खबरदारी घेतली आहे.

काँग्रेस, राष्ट्रवादी पुन्हा सदस्य फोडण्याचा प्रयत्न करतील हे लक्षात घेऊन सर्व सदस्यांना हैद्राबाद येथे हलवण्यात आल्याचे समजते. सभापतीपदासाठी भाजपकडून निरंजन आवटी आणि जगन्नाथ ठोकळे यांची नावे आघाडीवर आहेत. त्याबरोबरच सविता मदने, संजय यमगर हेही इच्छूक आहेत. महापौर निवडणुकीत झालेल्या धक्कादायक पराभवानंतर भाजपचे प्रदेशाध्यक्षचंद्रकांत पाटील यांनी सभापती निवडीवर बारकाईने लक्ष ठेवले आहे. त्यामुळे त्यांच्याच सुचनेवरुन सर्व सदस्यांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आल्याची चर्चा आहे. त्यांची जबाबदारी माजी उपमहापौर धिरज सुर्यवंशी यांच्याकडे देण्यात आली आहे.

हेही वाचा: पक्ष प्रवेशाचे नाट्य म्हणजे मुख्यमंत्र्यांचा अपमान; BJP चा दावा

काँग्रेस निवडणूक लढवणार

महापौर, उपमहापौर निवडणूकीवेळी झालेल्या चर्चेनुसार स्थायी समितीसभापतीपद काँग्रेसला देण्याचे ठरले होते. सभापती पदासाठी काँग्रेसचे करणजामदार आणि फिरोज पठाण इच्छूक आहेत. पठाण यांनी थेट नेत्या जयश्री पाटीलयांच्याकडे उमेदवारीची मागणी केली आहे. गेल्या स्थायी सभापती निवडणूकीतभाजपमधील दोन सदस्य गळाला लागले असताना काँग्रेसला राष्ट्रवादीने मदतकेली नव्हती. त्यामुळे मंगेश चव्हाण यांना पराभव पत्करावा लागला.त्यामुळे यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसला मदत कर णार का? याकडेही लक्ष आहे.सध्या तरी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची राष्ट्रवादीच्या नेत्यांबरोबर चर्चा सुरु असल्याचे सांगण्यात येते.

सभापती पदाची निवडणूक आम्ही लढवणार आहोत. भाजपामधील नाराज सदस्यांना घेऊन चमत्कार करु.

विरोधी पक्षनेते उत्तम साखळकर

स्थायी समितीमध्ये आमचे सदस्य जास्त आहेत. त्यामुळे सभापती आमचाच होणार

हे निश्‍चित आहे.

भाजपाचे सभागृह नेते विनायक सिंहासने

निवडीचा कार्यक्रम

स्थायी समितीच्या सभापती पदासाठी नऊ सप्टेंबर रोजी निवडणूक.

आठ सप्टेंबर रोजी दुपारी तीन वाजेपर्यत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत.

नऊ तारखेला सकाळी ११.३० वाजता सभापती पदाची निवडणूक.

loading image
go to top