सांगली : दोन टोळ्यांना तडीपारीचा दणका

एसपींची कारवाई गणेश सातपुते व ओंकार जाधव टोळीचा समावेश
Tadipari law
Tadipari lawsakal

सांगली : शहर पोलिस ठाणे हद्दीतील गुन्हेगार गणेश बाबासो सातपुते (वय ३३, रा. रमामातानगर, कुदळे प्लॉट) व ओंकार सुकुमार जाधव (वय २९, गारपीरजवळ, गणेशनगर) यांच्या टोळ्यांना पोलिस अधीक्षक दीक्षित गेडाम यांनी तडीपारीचा दणका दिला. दोन्ही टोळ्यातील १८ जणांवर ही कारवाई करण्यात आली आहे.

अधिक माहिती अशी, ओंकार जाधव याच्या टोळीविरुद्ध २०१३ ते २०२२ या काळात खून, खुनाचा प्रयत्न, घातक शस्त्राने हल्ला, बेकायदा जमाव, मारहाण, दमदाटी व शिवीगाळ, शासकीय कामात अडथळा आणणे असे गंभीर स्वरूपाचे ९ गुन्हे शहर, ग्रामीण, विश्रामबाग व मिरज ग्रामीण पोलिस ठाणे हद्दीत दाखल आहेत. या टोळीविरुद्ध तडीपारीचा प्रस्ताव शहर पोलिस ठाणे निरीक्षक अजय सिंदकर यांनी अधीक्षक श्री. गेडाम यांना सादर केला होता.

टोळीप्रमुख ओंकार जाधव याच्यासह साथीदार शुभम कुमार शिकलगार (वय २३, गारपीरजवळ), सुज्योत ऊर्फ बापू सुनील कांबळे (वय २३, रमामातानगर), आकाश ऊर्फ अक्षय विष्णू जाधव (२४, गारपीरजवळ), अमन अकबर शेख (वय २०, अलिशान चौक), कृपेश घनशाम चव्हाण (वय २१, माने चौक, शंभरफुटी), ऋषिकेश दुर्गादास कांबळे (वय २१, विठ्ठलनगर), साहिल हुसेन शेख (वय २२, नुरानी मशिदजवळ), राहुल रमेश नामदेव (वय २९, गारपीर चौक), प्रेमानंद इराप्पा अलगड्डी (वय ३१, गारपीर चौक), गणेश चन्नाप्पा बोबलादी (वय २४, प्रगती कॉलनी) याना सहा महिन्यांसाठी जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले.

हद्दीतील गुन्हेगार गणेश सातपुते याच्या टोळीविरुद्ध २०१७ ते २०२२ या काळात खून, खुनाचा प्रयत्न, घातक शस्त्राने दुखापत महिलांची छेडछाड, विनयभंग, शासकीय कामात अडथळा असे गंभीर ९ गुन्हे शहर व मंगळवेढा पोलिस ठाण्यात दाखल आहेत. टोळीविरुद्ध निरीक्षक सिंदकर यांनी तडीपारीचा प्रस्ताव अधीक्षक श्री. गेडाम यांना सादर केला होता. टोळीप्रमुख गणेश सातपुते याच्यासह साथीदार रोहित बाबासो सातपुते (वय ३२), हैदरअली हुमायूम पठाण (वय ३०), जाफर हुमायूम पठाण (वय २९, रमामातानगर, कुदळे प्लॉट), गणेश सुरेश मोरे (वय २६, गारपीर चौक), निखिल सुनील गाडे (वय ३१), राहुल सावंता माने (वय २९, रमामातानगर, कुदळे प्लॉट) यांना सहा महिन्यांसाठी सांगली व सोलापूर जिल्ह्यातून तडीपार केले.

अधीक्षक श्री. गेडाम, अप्पर अधीक्षक मनीषा दुबुले, गुन्हे अन्वेषणचे निरीक्षक सर्जेराव गायकवाड, शहर निरीक्षक सिंदकर, कर्मचारी सिद्धाप्पा रूपनर, संजय पाटील, विक्रम खोत यांच्या पथकाने ही कारवाई केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com