esakal | विनायक राऊत समोर आलात तर पायातील चप्पल तोंडात मारू...
sakal

बोलून बातमी शोधा

 nanar support in the project gathering kokan marathi news

 शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांनी प्रेरित होऊन संघटना रुजविली आणि वाढविली. चप्पल मारणे सोपे नाही. समोर आलात तर पायातील चप्पल तोंडात मारू...

विनायक राऊत समोर आलात तर पायातील चप्पल तोंडात मारू...

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

राजापूर (रत्नागिरी ) : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांनी प्रेरित होऊन संघटना रुजविली आणि वाढविली. चप्पल मारणे सोपे नाही. समोर आलात तर पायातील चप्पल तोंडात मारू, अशा शब्दात सागवे जिल्हा परिषद गटाच्या सदस्या लक्ष्मी शिवलकर यांनी खासदार विनायक राऊत यांचा समाचार घेतला. सागवेचे माजी विभागप्रमुख राजा काजवे यांनी ज्यांनी शिव्या घातल्या ते प्रिय, असा टोला खासदार विनायक राऊत यांना लगावला.   

सागवे येथे रविवारी (ता. १) झालेल्या शिवसेनेच्या प्रकल्पविरोधी मेळाव्यात खासदार विनायक राऊत यांनी बोलताना प्रकल्पाचे समर्थन करणाऱ्या शिवसैनिकांना जोड्यांनी मारा, असे वक्तव्य केले होते. संघटनाविरोधी भूमिका घेतल्याबद्दल सौ. शिवलकर यांची हकालपट्टी करीत असल्याची घोषणा केली होती. त्याचा सौ. शिवलकर यांनी आज खरपूस समाचार घेतला.

हेही वाचा- बापरे !  या जिल्हात अजूनही चाळीस कोटी रुपये शिल्लकच..

शिवसैनिकांवर कारवाई करा
त्या म्हणाल्या, जिल्हा परिषद सदस्य म्हणून मिळणाऱ्या निधीतून किती विकास होणार? मतदारसंघासह परिसराचा विकास व्हायचा असेल तर प्रकल्पांची आवश्‍यकता आहे. त्यामुळे नाणार हवा आहे. श्री. काजवे यांनी समर्थक शिवसैनिकांना जोड्यांनी मारा या खासदार राऊत यांच्या वक्‍तव्यावर बोलताना हिंमत असेल तर शिवसैनिकांवर कारवाई करा, असे आव्हान दिले. भगव्या गमछा घालून 

हेही वाचा-  पोटच्या गोळ्यासाठी आईच काळीज धावल अन्... ​

शिवसैनिकांची उपस्थिती
सागवेच्या बैठकीत खासदार राऊत यांनी प्रकल्प समर्थक शिवसैनिक वा पदाधिकाऱ्यांना जोड्यांनी मारण्याचे वक्तव्य केले होते. त्यामुळे आजच्या समर्थकांच्या मेळाव्यामध्ये समर्थक शिवसैनिक उपस्थित राहणार का याची साऱ्यांना उत्सुकता होती. मात्र शिवसेनेच्या भगव्या गमछा गळ्यामध्ये घालून उपस्थित असलेल्या अनेक शिवसैनिकांनी साऱ्यांचे लक्ष वेधून घेतले होते.

loading image