दोन दिवस उशीर झाला असता तर...

निराधार युवकाला संतोष अबगुल प्रतिष्ठानची मदत; डोळ्याच्या शस्त्रक्रियेचा उचलला खर्च; वेळेत वैद्यकीय उपचार
Santosh Abgul Foundation provide Timely medical treatment for eye surgery to youth
Santosh Abgul Foundation provide Timely medical treatment for eye surgery to youth Sakal

मंडणगड : किती उशिराने तुम्ही आमच्यापर्यंत आला आहात, अजून दोन दिवस उशीर झाला असता तर कदाचित यांचे दोन्ही डोळे हे निकामी झाले असते असे केईएम हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी म्हणताच वेळेत वैद्यकीय उपचारासाठी मदत उभी केल्याचे सार्थक झाल्याचे संतोष अबगुल प्रतिष्ठानला जाणवले. मंडणगडमधील एका निराधार युवकासाठी प्रतिष्ठान धावले आणि दोन्ही डोळे निकामी होण्यापासून वाचविल्याची घटना दोन दिवसांपूर्वी घडली असून निरपेक्ष सामाजिक कार्याचा आदर्श उभा राहिला आहे.

मंडणगड येथील भिंगलोळी येथील एका युवकाला डोळ्याचा त्रास होता. चार दिवसांपूर्वी एका भगिनींनी फोन करून संतोष अबगुल यांना या युवकाबद्दल सांगताना एका डॉक्टरकडे दाखवले असून त्यांच्या डाव्या बाजूचा डोळा हा पूर्णपणे निकामी होत आलेला आहे. जर त्या डोळ्याचे ऑपरेशन लवकरात लवकर केले नाही तर दुसरा डोळा देखील देखील निकामी होऊ शकतो. यासाठी ७० ते ८० हजार एवढा खर्च सांगितलेला आहे. आपल्या प्रतिष्ठानच्या माध्यमातून कमी खर्चात डोळ्यांचे ऑपरेशन होते म्हणून फोन केल्याचे सांगितले. त्याला दुजोरा देताना मंडणगडमधील प्रतिष्ठानचे सक्रिय सदस्य समीर कदम यांनी त्यातील गांभीर्य अबगुल यांच्या निदर्शनात आणून दिले. यानंतर आई वडील नसलेल्या एका निराधार युवकाच्या डोळ्याची सर्जरी प्रतिष्ठानच्या वतीने १०० टक्के मोफत करण्याचा निर्णय झाला. प्रतिष्ठानचे विकास ढेकळे यांच्या माध्यमातून प्रतिष्ठानने मदतीचा हात पुढे करीत मुंबईत येण्याची सूचना केली.

एका ताईसोबत त्या युवकाने मुंबई गाठली. विकास ढेकळे, संतोष पांचाळ यांनी सकाळी सात पासून केईएम हॉस्पिटलमध्ये त्यांना सर्वोतोपरी सहकार्य करीत त्यांचे दिवसभरात विविध रिपोर्ट काढून घेतले. ओपिडीमध्ये सर्व तपासण्या झाल्यानंतर डोळ्यांची सोनोग्राफी पाहून वरिष्ठ डॉक्टरांनी दुसऱ्या दिवशीच शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. डोळ्यांसाठी स्पेशालिस्ट असणारे बच्चू अली हॉस्पिटल परळ येथून ऑपरेशनसाठी लागणाऱ्या पडद्याची व्यवस्था करण्यास सांगितली. विकास ढेकळे यांनी धावपळ करून तोही उपलब्ध करून दिला. नियोजित प्रमाणे अखेर डोळ्यांची शस्त्रक्रिया यशस्वी झाली आहे. संतोष अबगुल प्रतिष्ठानचे सहकार्य, मदतीने एका निराधार युवकाला कायमचे दृष्टीहीन होण्यापासून वाचविले आहे. प्रतिष्ठानचे एकच ध्येय आहे, जमेल तेवढे सामाजिक कार्य करायचं. जमेल तेवढे निराधार, गरजूंच्या कामी यायचं आणि हे आयुष्य सत्कारणी लावण्याचा संकल्प कृतिशील उतरत आहे. मात्र असे करताना मदत करणाऱ्याचे नाव कोठेही येणार नाही याचीही दक्षता घेत मदत केल्याचे बिंबवत नसल्याने निरपेक्ष मदतीचे थोर विचार दिसून येतात.

गावातील मुलाच्या डोळ्याला गंभीर दुखापत झाल्याने ऑपरेशन नाही केले तर दुसरा डोळाही बाद होणार होता. संतोषदादा अबगुल यांना फोन केला असता त्यांनी त्वरित सर्व जबाबदारी घेत त्याच्या डोळ्यांचे ऑपरेशन करून घेतले. संतोषदादा अबगुल, विकास ढेकळे, संतोष पांचाळ व प्रतिष्ठानचे मानावे तेवढे आभार कमीच आहेत. देवदूत प्रमाणे सर्व धावून आले.

- समीर कदम

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com