esakal | पर्यावरणपूरक मूर्तींसाठी संतोष जामसंडेकर यांचा हा प्रयोग
sakal

बोलून बातमी शोधा

Santosh Jamsandekar Experiment On Eco Friendly Idols

भडकंबा येथील संतोष जामसंडेकर यांचा गणेशमूर्ती कारखाना हा गेली सुमारे 50 वर्षांपासून सुरू आहे. त्यांचे आजोबा शंकर जामसंडेकर यांनी सुरू केलेला हा कारखाना वडील चंद्रकांत यांनी पुढे सुरू ठेवला. व

पर्यावरणपूरक मूर्तींसाठी संतोष जामसंडेकर यांचा हा प्रयोग

sakal_logo
By
अमित पंडित

साखरपा ( रत्नागिरी ) - प्लास्टरच्या गणेशमूर्ती विरघळत नाहीत व मातीच्या मूर्ती काढण्यास अवघड असतात. यावर उपाय म्हणून भडकंबा येथील संतोश उर्फ बाळू जामसंडेकर यांनी 80 टक्के माती आणि 20 टक्के प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मिश्रणातून गणेशमूर्ती साकारल्या. यासाठी त्यांनी स्थानिक डोंगरातील लाल मातीचा वापर केला आहे. त्यामुळे या मूर्ती पर्यावरणस्नेही ठरल्याहेत. 

भडकंबा येथील संतोष जामसंडेकर यांचा गणेशमूर्ती कारखाना हा गेली सुमारे 50 वर्षांपासून सुरू आहे. त्यांचे आजोबा शंकर जामसंडेकर यांनी सुरू केलेला हा कारखाना वडील चंद्रकांत यांनी पुढे सुरू ठेवला. वडील प्राथमिक शिक्षक; पण आपल्या वडिलांची कला त्यांनी पुढे जोपासली. शाळेची नोकरी सांभाळून त्यांनी कारखाना वाढवला. त्यांनी त्यांच्या हाताखाली तयार केलेल्या दोन कलाकारांनी आज गावात स्वत:चा स्वतंत्र व्यवसाय सुरू केला.

संतोष हे स्वत: सुवर्णकार आहेत. गणपतीच्या काळात तीन महिने दुकान पूर्णपणे बंद ठेवून ते गणेशशाळेकडे लक्ष केंद्रित करतात. आज त्यांच्या मूर्तिशाळेत 10 कामगार आहेत. अश्वारूढ गणेश ही संतोष यांची खासियत. या मूर्तींना परिसरात मोठी मागणी आहे. यंदा सुमारे 125 अश्वारूढ झालेल्या मूर्ती त्यांनी बनवल्या आहेत. प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती पर्यावरणास हानिकारक असतात. त्यावर उपाय म्हणून एक अभिनव प्रयोग केला आहे.

80 टक्के माती आणि 20 टक्के प्लास्टर ऑफ पॅरिसपासून तयार केलेल्या मूर्ती यंदा त्यांनी तयार केल्या. संतोष यांनी स्वत: महिनाभर यावर प्रयोग करून या प्रमाणात मूर्ती तयार केल्या. विसर्जनानंतर या मूर्ती संपूर्णपणे दहा तासात विरघळतात, असं ते सांगतात. सध्या संतोष यांचा मुलगाही ही कला जोपासत आहे. त्याच्या रूपाने जामसंडेकर यांची चौथी पिढी या क्षेत्रात उतरली आहे. 

दृष्टिक्षेपात.. 
स्थानिक लाल माती, पीओपीच्या मूर्ती 
आठ ते दहा तासांत मूर्ती विरघळते 
अश्वारूढ गणेशमूर्तींची खासियत 
सूरत, चेन्नईतूनही मूर्तींना मागणी  

 
संपादन - राजेंद्र कृष्णराव घोरपडे

loading image