esakal | गावाची एकी राखण्यासाठी सत्ता सोडण्याचा आदर्श पायंडा, कोठे घडली ही घटना ? 
sakal

बोलून बातमी शोधा

Sarpanch Leave Power To Maintain Unity Of Village

सरपंच अर्पिता पवार यांनी राजीनामा दिला. त्यांच्याजागी श्रावणी पागडे यांना पद द्यायचे ठरले होते. पण थेट निवडणूक रद्द झाल्याने पेच आला. पागडे सदस्यही नव्हत्या. त्यामुळे त्यांना आधी सदस्य बनू देण्यासाठी प्रभाग एकमधील शांताराम पागडे यांनी सदस्यपदाचा राजीनामा दिला.

गावाची एकी राखण्यासाठी सत्ता सोडण्याचा आदर्श पायंडा, कोठे घडली ही घटना ? 

sakal_logo
By
मयूरेश पाटणकर

गुहागर ( रत्नागिरी ) - सत्ता मिळविण्यासाठी कोणत्याही थराला जाण्याची उदाहरणे ग्रामपंचायतीपासून सतत आढळत असताना गावच्या निर्णयाची अंमलबजावणी होण्यासाठी सरपंचपद आणि सदस्यपदाचा त्याग करून एकी राखण्याचे उदाहरण तालुक्‍यातील आबलोली गावाने घालून दिले आहे. ग्रामपंचायत वगळता उर्वरित सर्व निवडणुकीत व्यक्तीगत मताला प्राधान्य असले तरी गावासाठी एकी हे ब्रीद जपण्यात आले. 

सरपंच अर्पिता पवार यांनी राजीनामा दिला. त्यांच्याजागी श्रावणी पागडे यांना पद द्यायचे ठरले होते. पण थेट निवडणूक रद्द झाल्याने पेच आला. पागडे सदस्यही नव्हत्या. त्यामुळे त्यांना आधी सदस्य बनू देण्यासाठी प्रभाग एकमधील शांताराम पागडे यांनी सदस्यपदाचा राजीनामा दिला. आता गावकीत ठरलेल्या श्रावणी पागडे यांचा बिनविरोध सरपंच होण्याआधी सदस्य होण्याचा मार्ग मोकळा झाला. गेली 20 वर्ष

आबलोलीतील ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध होते. त्यासाठी वाडीप्रमुख आणि तंटामुक्त समितीचे अघोषित नियामक मंडळ आहे. या मंडळाने प्रत्येक वाडीला सरपंचपद मिळण्यासाठी एक व्यवस्था निर्माण केली. 2017 मध्ये आबलोली ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध झाली. त्यावेळी थेट जनतेतून निवडावयाच्या सरपंचासाठी सव्वा दोन वर्षांचा कालावधी निश्‍चित करण्यात आला. त्यामुळे पवार यांनी राजीनामा दिला.

प्रभाग 1 मधील श्रावणी पागडे याना सरपंचपद द्यायचे आहे. त्यासाठी त्या सदस्य हव्यात. त्यावर प्रभाग 1 मधील सदस्य शांताराम पागडे यांनी राजिनामा दिला.गावातील प्रमुख मंडळींनी जिल्हाधिकाऱ्यांकडे सरपंच निवडीपूर्वी प्रभाग क्र. 1 ची पोटनिवडणूक घेण्याची मागणी केली. ही पोटनिवडणूक जाहीर झाल्यावर उच्चशिक्षित श्रावणी पागडे निवडून येतील. त्यानंतर सरपंच पदाची माळही त्याच्या गळ्यात पडेल. 

आबलोलीचा आदर्श 
प्रत्येक ग्रामस्थ व्यक्तिगत पातळीवर मतदान करतो. ग्रामस्थ आपल्या पक्षाचे काम करतात. मात्र ग्रामपंचायत निवडणुकीत सर्वजण गाव विकासासाठी एकत्र येतात. सध्या निर्माण झालेल्या पेचातही गावाने एकमुखी निर्णय घेतला. 

सरपंचपदासाठी अर्जच नाही 
दरम्यान निवडणूक शाखेने आबलोली ग्रामपंचायतीचा सरपंच निवडीचा कार्यक्रम घोषित केला. मात्र एकाही ग्रामपंचायत सदस्याने सरपंच पदासाठी उमेदवारी दाखल केली नाही. गावाच्या एकीचे संघटित रुप या निमित्ताने तालुक्‍याला पहायला मिळाले. 
 

 
 

loading image