

A car overturned near Suroor on the Pune-Bengaluru Highway, claiming the lives of a father and daughter and seriously injuring three others
चिपळूण : पुणे- बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर सुरूर गावच्या हद्दीत सातारा बाजूकडे निघालेल्या मोटारीचा शनिवारी भीषण अपघात झाला. यामध्ये बाप-लेकीचा मृत्यू झाला, तर १३ वर्षीय मुलासह तिघे गंभीर जखमी झाले. अपघात एवढा भीषण होता की, गाडीचा चक्काचूर झाला असून, आपल्या लेकीचा संसार पाहण्यासाठी गेलेल्या कुटुंबावर संकट आले आहे.