

women Revenue officer arrested news
esakal
Dapoli corruption news : सातबारा उताऱ्यावर फेरफार नोंद करण्यासाठी १० हजार रुपयांची लाच स्वीकारल्याप्रकरणी नानटे येथील महिला ग्राम महसूल अधिकाऱ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. ही कारवाई बुधवारी (ता. २५) केली. श्रीमती श्रद्धा बालाजी बंडे (वय ३०, ग्राम महसूल अधिकारी, सजा नानटे, ता. दापोली) असे कारवाई झालेल्या अधिकाऱ्याचे नाव आहे. त्यांच्याविरुद्ध गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू असून, पुढील तपास सुरू आहे. जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी सरकारी कर्मचाऱ्यांवर कारवाई झाल्यामुळे महसूल विभागात खळबळ उडाली आहे.