दुर्मिळ खवले मांजराला रस्त्यातुन सुरक्षित हलविले ; कोकणात युवकांच्या कामगिरीच कौतुक

save pangolin from accident by youth in lanja ratnagiri and release forest
save pangolin from accident by youth in lanja ratnagiri and release forest

लांजा (रत्नागिरी) : तळवडे गावातील युवकांनी प्रसंगावधान साधून दुर्मिळ खवले मांजराला जीवदान दिले. ही कौतुकास्पद घटना रविवारी (10) रात्री घडली. यापूर्वीही खवले मांजर वाचविण्यासाठी येथील युवकांनी प्रयत्न केले होते. दीड वर्षांच्या या खवले मांजराला लांजा वनपाल यांच्याकडे स्वाधीन करून नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले. 

रविवारी रात्री 11 वाजता तळवडे कणगवली तळवडे रस्त्यावर खवले मांजर भेदरलेल्या अवस्थेत तळवडे येथील प्रशांत शेट्ये, सौरभ कारेकर (कणगवली), प्रशांत तिखे यांच्या निदर्शनास आले. हे तेव्हा क्रिकेट सामने खेळून येत होते. खवले मांजराला कोणताही अपघात वा इजा होऊ नये, यासाठी त्यानी रस्त्यातुन दुर्मिळ खवले मांजराला सुरक्षित हलविले.

प्रशांत शेट्ये यांनी सरपंच संजय पाटोळे, पोलिसपाटील बाबू पाटोळे यांना याबाबत माहिती दिली. त्यानी तातडीने वनपाल विठ्ठल आरेकर, वनरक्षक सागर पताडे यांना माहिती दिली रात्री तातडीने वन अधिकारी दाखल झाले. त्या खवले मांजरला ताब्यात घेऊन नैसर्गिक अधिवासात सोडले. वनपाल विट्ठल आरेकर, वनपाल सागर पाताडे यांनी तळवडे येथील प्रशांत शेट्ये, प्रशांत तिखे, सौरभ कारेकर या प्राणी मित्राचे कौतुक केले आहे. 

यापूर्वीही महत्वपूर्ण योगदान 

जिल्ह्यात दुर्मिळ खवले मांजर यांचे अस्तिव धोक्‍यात आले असताना तळवडे गावातील घटना दिलासादायक आहे. राज्य शासनाने दुर्मिळ खवले मांजर वाचवा मोहीम हाती घेतली आहे. तळवडे गावाने यापूर्वी ही खवले मांजर वाचविण्यासाठी महत्वपूर्ण योगदान दिले आहे. 

संवर्धनासाठी युवकांना प्रोत्साहन देण्याचा विचार 

तळवडे गावातील युवकांच्या या कामगिरीची वनखात्याने दखल घेतली असून खवले मांजर संवर्धनासाठी या युवकांना प्रोत्साहन देण्यासाठी वनखाते विचाराधीन आहे.  

संपादन - स्नेहल कदम 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com