esakal | Pimpri: शहरातील मंदिरांसह सर्व धार्मिक स्थळे गुरुवारपासून खुली
sakal

बोलून बातमी शोधा

पिंपरी : शहरातील मंदिरांसह सर्व धार्मिक स्थळे गुरुवारपासून खुली

पिंपरी : शहरातील मंदिरांसह सर्व धार्मिक स्थळे गुरुवारपासून खुली

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पिंपरी : गेल्या दीड वर्षांपासून शहरातील मंदिरांसह सर्व धार्मिक स्थळे कोरोनामुळे बंद आहेत. आता संसर्गाचे प्रमाण घटल्यामुळे गुरुवारपासून (ता. ७ ऑक्टोबर) मंदिरांसह सर्व धार्मिक स्थळे व प्रार्थना स्थळे उघडण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यानुसार महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनी मंगळवारी आदेश काढला.

कोरोनामुळे राज्य सरकारने धार्मिक स्थळ बंद केली होती. रुग्णांची संख्या कमी होत असताना मंदिरे खुले करावीत यासाठी राज्य सरकार विरोधात विरोधी पक्षांनी आंदोलन केले होते. दरम्यान, नवरात्र पासून अर्थात ७ आॅक्टोबर पासून मंदिर खुले होतील असे राज्य सरकारने स्पष्ट केले होते. त्यानुसार सरकारचा आदेश आल्यानंतर महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनी आदेश काढला आहे. ट्रस्ट, धार्मिक व्यवस्थापन यांनी धार्मिक स्थळे, प्रार्थना स्थळे केव्हा खुली असतील याची वेळ निश्चित करून याचे काटेकोर पालन करावे. धार्मिक स्थळांमध्ये येणाऱ्या नागरिकांनी मास्कचा वापर करावा, थर्मल गणने तपासणी करावी, सॅनिटाइजरची सुविधा असावी. तसेच याठिकाणी गर्दी होणार नाही सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन केले जाईल याकडे लक्ष ठेवावे असे आदेशात नमूद केले आहे.

हेही वाचा: पिंपरी : उर्दू माध्यम शाळा शिक्षकाविना

नवरात्रासाठी नियमावली

गुरुवार (ता. ७) पासून नवरात्र महोत्सव सुरू होत असताना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर साधेपणाने उत्सव साजरा करावा असे आवाहन महापालिकेने केले आहे.

- मंदिरापुढे नियमांचे पालन करून साधा मांडाव घालावा,

- नागरिकांची गर्दी होईल अशी सजावट करू नये,

- मंडळात ४ फूट तर घरात २ फुटापेक्षा मोठी मूर्ती असू नये.

- गरबा, दांडिया व इतर सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करू नयेत

- मूर्ती विसर्जन करताना पर्यावरण पूरक कृत्रिम हौदात करावे असे आवाहन महापालिकेने केले आहे.

loading image
go to top