
सावंतवाडी: कणकवली येथे मटका-जुगार अड्ड्यांवर पालकमंत्री नीतेश राणे यांनी टाकलेल्या धाडीनंतर प्रशासनाला कारवाई करावी लागली. मात्र, या कारवाईमुळे त्यांच्या प्रशासनातील पोलिस खात्याचा भ्रष्ट कारभार उघड झाला आहे. सावंतवाडी तालुक्यातदेखील बेकायदा दारू, मटका व जुगार उघडपणे सुरू असून, काही अवैध व्यवसाय हे त्यांच्या पक्षातील पदाधिकाऱ्यांचेच असल्याचा आरोप ठाकरे शिवसेना पक्षाचे प्रवक्ते आशीष सुभेदार यांनी प्रसिद्धी पत्रकातून केला आहे. त्यामुळे अशा अड्ड्यांवरही पालकमंत्री राणे धडक कारवाई करतील का, असा प्रश्न त्यांनी विचारला आहे.