
सावंतवाडी : साटेली पोलिसपाटलांवर बंदूक रोखणाऱ्यांवर गुन्हा
सावंतवाडी: साटेलीचे पोलिसपाटील विलास रवींद्र साटेलकर यांच्यावर बंदूक रोखून ठार मारण्याची धमकी देत, कोयत्याने हाताच्या मनगटावर दुखापत केल्याप्रकरणी सावंतवाडी पोलिस ठाण्यात शंकर रमाकांत सावंत व रमाकांत चंद्रकांत सावंत (रा. साटेली कानवडवाडी) त्यांच्यासह अन्य दोन अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी ः साटेली-मधलीवाडी येथील विलास साटेलकर यांच्या मालकीच्या जमिनीतील झाडाला लागलेले आंबे शंकर सावंत, रमाकांत सावंत व अन्य दोघे मिळून काढत होते. त्याला साटेलकर यांनी विरोध केला. यातून राग आल्याने शंकर सावंत यांनी हातातील कोयता साटेलकर यांच्या मनगटावर मारला तर रमाकांत सावंत त्यांनी हातातील बंदूक रोखून जीवे ठार मारण्याची धमकी दिली.
यावेळी अन्य दोघांनीही शिवीगाळ करत ठार मारण्याची धमकी दिली. या घटनेत साटेलकर जखमी झाले. या प्रकरणी साटेलकर यांनी पोलिसात धाव घेत फिर्याद दिली. त्यावरून चौघांविरुद्ध पोलिस ठाण्यात मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Web Title: Sawantwadi Crime Against Stopped Guns Sateli Police Station
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..