esakal | सावंतवाडी : घरपट्टीवाढीसाठी सभा हे तर सोंग
sakal

बोलून बातमी शोधा

बाबु कुडतरकर

घरपट्टीवाढीसाठी सभा हे तर सोंग

sakal_logo
By
रूपेश हिराप

सावंतवाडी ः शहरात यापुढे घरपट्टी वाढ नाही, असा ठराव चार वर्षांपूर्वी बबन साळगावकर नगराध्यक्ष असताना घेण्यात आला होता. त्यामुळे घरपट्टी वाढीसंदर्भात विशेष सभा घेण्याची गरज नसताना केवळ निवडणूक डोळ्यासमोर ठेवून नगराध्यक्ष संजू परब यांनी केलेले हे सोंग असल्याचा आरोप शिवसेना शहरप्रमुख तथा नगरसेवक खेमराज उर्फ बाबू कुडतरकर यांनी केला.

घरपट्टी संदर्भातील सभेला शिवसेनेचे नगरसेवक अनुपस्थित का राहिले असा सवाल करणाऱ्या नगराध्यक्षांनी भाजपचे काही सदस्यही अनुपस्थित का होते याचा आधी विचार करावा, असा पलटवार श्री. कुडतरकर यांनी केला.

हेही वाचा: घटस्थापनेपासून मंदिरं उघडणार; मुंबईकरांना मात्र 'हा' नियम लागू

नगराध्यक्ष परब यांनी दोन दिवसांपूर्वी पत्रकार परिषद घेऊन पालिका विरोधी गटनेते अनारोजीन लोबो यांच्यासह आमदार दीपक केसरकर यांच्यावर टीका केली होती. घरपट्टी वाढी संदर्भात महत्त्वाचा विषय असतानाही विशेष सभेला गैरहजर राहून शिवसेनेच्या नगरसेवकांनी काय साध्य केलं असा प्रश्न उपस्थित करत पालकमंत्री उदय सामंत आणि आमदार दिपक केसरकर यांच्यात पटत नसल्याने शहर विकासावर परिणाम झाल्याचेही त्यांनी म्हटले होते. याला आज नगरसेवक श्री. कुडतरकर यांनी पत्रकार परिषद घेऊन उत्तर दिले.

श्री. कुडतरकर म्हणाले, ``मुळात बबन साळगावकर हे नगराध्यक्ष असताना आम्ही सावंतवाडी शहरामध्ये घरपट्टी संदर्भात निर्णय घेऊन यापुढे घरपट्टी वाढ नाही, असा ठराव घेऊन घरातील नागरिकांना दिलासा दिला होता. शिवाय आता ही घरपट्टी वाढ नको असे आम्ही सांगितले होते; परंतु निवडणूक डोळ्यासमोर ठेवून विशेष सभा घेत आपणच काहीतरी केलं असे दाखवण्याचा नगराध्यक्ष यांचा प्रयत्न आहे; मात्र शहरातील जनता सुज्ञ असून ती यांच्या असल्या प्रकारांना कदापि फसणार नाही. शहरामध्ये आमदार केसरकर यांनीच दिलेल्या निधीतून पूर्ण झालेल्या प्रकल्पाचे उद्घाटने आपल्या नेत्यांना आणून नगराध्यक्ष यांनी केली. त्यावेळी त्यांना केसरकर यांनी दिलेला निधी दिसला नव्हता का? आमदार केसरकर आणि पालकमंत्री उदय सामंत यांच्यामध्ये चांगले संबंध असून पालकमंत्री केसरकर यांना विचारल्याशिवाय शहरांमध्ये कुठल्याही प्रकारची कामे करत नाहीत. पालकमंत्र्यांच्या हस्ते शहरातील रस्त्यांची तसेच इतर विकास कामांना जिल्हा नियोजनमधून निधी उपलब्ध करून दिलेला आहे. त्याची माहिती नगराध्यक्ष यांनी करून घ्यावी.``

श्री. कुडतरकर पुढे म्हणाले, ``पालकमंत्री सामंत दिलेला शब्द पाळतात. त्यामुळे त्यांच्यावर टीका करण्याआधी नगराध्यक्ष परब यांनी पालिकेच्या नवीन इमारतीसाठी आवश्यक असलेला प्रस्ताव तयार करून तो संबंधित यंत्रणेकडे सादर करावा. गटनेत्या लोबो सुशिक्षित असल्यामुळेच त्यांना येथील जनतेने तब्बल सहावेळा निवडून दिले आहे. त्या लोकांची कामे करतात म्हणूनच त्या एवढ्या वेळा निवडून आल्या आहेत.``

loading image
go to top