घटस्थापनेपासून मंदिरं उघडणार; मुंबईकरांना मात्र 'हा' नियम लागू

Temples
Templessakal media

मुंबई : घटस्थापनेपासून प्रार्थनास्थळे आणि धार्मिक स्थळे खुली करण्याची परवानगी राज्य सरकारने (mva government) दिली आहे. मात्र, क्षमतेच्या फक्त ५० टक्के उपस्थिती ठेवता येणार आहे. असा नियम महानगरपालिकेने (bmc) जाहीर केला आहे. राज्य सरकारने मागील आठवड्यात राज्यातील सर्व धार्मिक स्थळे (religious places), प्रार्थनास्थळे 7 ऑक्टोबर घटस्थापनेपासून खुली करण्याचा निर्णय जाहीर केला आहे.

Temples
आरोप करणाऱ्या महिलेला ओळखत नाही; आमदार साटम यांचा खुलासा

राज्य सरकारने यासाठी नियमावलीही तयार केली आहे. मात्र, प्रवेश क्षमतेची नियमावली ठरविण्याचे अधिकार स्थानिक प्रशासनावर साेडले होते. त्यानुसार महानगरपालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी आज राज्य सरकारने तयार केलेले नियम कायम ठेवले आहे. त्यात, क्षमतेच्या फक्त 50 टक्के उपस्थीती ठेवण्याची अट ठेवली आहे. या नियमावलीचे पालन करणे संबंधितांना बंधनकारक करण्यात आले आहे. या आदेशाची अंमलबजावणी करण्यास टाळाटाळ केल्यास आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार कारवाई करण्यात येईल असेही पालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

प्रसाद वाटपाला बंदी

मुर्ती किंवा धार्मिक प्रतिकांना हात लावू नये. मास्क वापरणे बंधनकारक. 65 वर्षावरील दिर्घकालीन आजार असलेले रुग्ण,गरोदर महिला,10 वर्षाखालील बालकांनी येऊ नये असा सल्ला राज्य सरकारने दिला आहे. दोन व्यक्तींमध्ये सहा फुटाचे अंतर असावे. प्रवेशव्दारावर स्क्रिनींग आणि सॅनिटायझरची सोय असवी. कोविड सदृष्य लक्षणे असलेल्या व्यक्तींना प्रवेश दिला जाऊ नये.महत्वाचे म्हणजे प्रसाद वाटपाला बंदी असून पवित्र जलही शिंपडू नये असे निर्देश राज्य सरकारने दिले आहेत. प्रतिबंधीत क्षेत्रातील प्रार्थना आणि धार्मिक स्थळे बंद राहाणार आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com