'हे' काम तातडीने पुर्ण करा अन्यथा तक्रार मुख्यमंत्र्यांकडे

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 21 मार्च 2018

सावंतवाडी: वनविभागाकडून वीज अधिकार्‍यांवर गुन्हे दाखल करण्याच्या नोटीसा देण्यात आल्यामुळे चौकुळ बेरडकी येथील आदिवासीवाड्यातील तब्बल चाळीस घरे वीजेपासून आज ही वंचित आहेत. हा प्रकार केवळ वनविभाग आणि वीज अधिकारी यांच्यात समन्वय नसल्यामुळे घडल्याचे उघड झाले आहे. दरम्यान, हे काम तातडीने पुर्ण करा अन्यथा थेट संबधित विभागाच्या मंत्र्यासह मुख्यमंत्र्याकडे तक्रार करू, असा इशारा भाजपाचे प्रदेश सरचिटणीस तथा माजी आमदार राजन तेली यांनी आज (बुधवार) येथे दिला.

सावंतवाडी: वनविभागाकडून वीज अधिकार्‍यांवर गुन्हे दाखल करण्याच्या नोटीसा देण्यात आल्यामुळे चौकुळ बेरडकी येथील आदिवासीवाड्यातील तब्बल चाळीस घरे वीजेपासून आज ही वंचित आहेत. हा प्रकार केवळ वनविभाग आणि वीज अधिकारी यांच्यात समन्वय नसल्यामुळे घडल्याचे उघड झाले आहे. दरम्यान, हे काम तातडीने पुर्ण करा अन्यथा थेट संबधित विभागाच्या मंत्र्यासह मुख्यमंत्र्याकडे तक्रार करू, असा इशारा भाजपाचे प्रदेश सरचिटणीस तथा माजी आमदार राजन तेली यांनी आज (बुधवार) येथे दिला.

तालुक्यातील चौकुळ चिखलव्हाळ बेरडकी भागात राहणार्‍या आदीवासी समाजातील लोकांना गेल्या सहा वर्षापूर्वी पासून आपल्या झोपड्यात वीज पुरवठा देण्यात यावा, अशी मागणी केली होती. त्या मागणीनुसार संबधितांनी दोन वर्षापुर्वी तत्कालीन पंचायत समिती उपसभापती महेश सारंग यांच्या नेतृत्वाखाली येथील वीज कार्यालयासमोर उपोषण केले होते. त्यानंतर त्यांना वीज पुरवठा करण्यासाठी निधी उपलब्ध करुन देण्यात आला होता.

दरम्यान, गेले काही महीने हे काम सुरू होते मात्र वीजेचे खांब घालण्यात येणारा काही भाग हा वनजमिनीत येत असल्याचे कारण पुढे करुन त्या ठिकाणी वीज कार्यालयाकडून करण्यात आलेले काम रोखण्यात आले आहे. तसेच आपली कोणतीही परवानगी न घेता काम सुरु ठेवल्यास तुमच्यावर गुन्हे दाखल करू, असा इशारा वनविभागाच्या अधिकार्‍यांनी दिला आहे. आपल्यावर गुन्हे दाखल होवू नयेत या भितीने त्या ठिकाणच्या अधिकार्‍यांनी वीज खांब उभारण्याचे काम अर्धवट टाकले आहे, त्यामुळे वाडीवर वीज येण्याचे त्यांचे स्वप्न दुभंगले आहेत.

याबाबतची तक्रार आज तेथील समाज बांधवानी श्री. तेली यांच्याकडे केली त्यानुसार नेमका काय याचा जाब विचारण्यासाठी श्री. तेली यांनी आज उपवनसंरक्षक समाधान चव्हाण यांची भेट घेतली यावेळी झालेल्या चर्चेत दोन्ही कार्यालयात समन्वय नसल्यामुळे हा प्रकार घडला असल्याचे श्री तेली यांच्या लक्षात आले. त्यांनी याबाबतच नाराजी व्यक्त केली आपण एकविसाच्या शतकाकडे जात असताना एक आदीवासी समाजाची वाडी वीजे पासून वंचित रहात असेल तर त्यापेक्षा दुदैवाची गोष्ट काही नाही अशी नाराजी व्यक्त केली आहे. तसेच याबाबत दोन्ही कार्यालयाच्या अधिकार्‍यांनी एकमेकांशी समन्वय साधुन याबाबत योग्य तो तोडगा काढावा आणी ते काम पुर्ण करावे असे त्यांनी सांगितले. तसेच या प्रकाराबाबत आपण संबधित खात्यांच्या मंत्र्यासोबत मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करणार आहे असे तेली यांनी यावेळी सांगितले यावेळी राजू गावडे, सिताराम परब आदी उपस्थित होते

वीज विभागाकडून अनधिकृतपणे काम
याबाबत श्री. तेली यांची चव्हाण यांना जाब विचारला असता त्या ठीकाणी काम करण्यास कायद्याने परवागनी मिळू शकते. मात्र तेथील जबाबदारी असलेले वीज अधिकारी चुकीच्या पध्दतीने आमची कोणतीही परवागनी न घेता काम करीत आहेत, त्यामुळे हा प्रकार घडला त्यांनी रितसर परवागनी मागितल्यास आमचा कोणताही विरोध असणार नव्हता मात्र तशी प्रकीया संबधितांकडून झाली नाही.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sawantwadi news tribal people home electricity issue