Sawantwadi Road Railway Station latest news
esakal
सावंतवाडी : कोकणच्या रेल्वे कनेक्टिव्हिटीमध्ये अत्यंत मोठी आणि महत्त्वपूर्ण भर पडली आहे. दीर्घकालीन मागणी असलेल्या सावंतवाडी रोड रेल्वे टर्मिनसवर तीन अत्यंत महत्त्वाच्या एक्स्प्रेस (Konkan Railway latest news today) गाड्यांना व्यावसायिक थांबा देण्यास केंद्रीय रेल्वे मंत्रालयाने अधिकृत मंजुरी दिली आहे. यामध्ये देशातील प्रतिष्ठेची ‘राजधानी एक्स्प्रेस’ आणि ‘गरीब रथ’ यांसारख्या महत्त्वाच्या गाड्यांचा समावेश आहे. केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी यासंदर्भातील अधिकृत मंजुरीचे पत्र जारी केले आहे.