Sawantwadi | डेगवे-बाजारवाडी येथील घरास आग; दोन जखमी, लाखोंचे नुकसान

सावंतवाडी तालुक्यातील डेगवे-बाजारवाडी येथील भर बाजारपेठेतील रुपेश केसरकर यांच्या घराला काल रात्री शॉर्टसर्किट होऊन आग लागण्याची घटना घडली
Sawantwadi fire
Sawantwadi firesakal media
Updated on: 

बांदा(सिंधुदुर्ग) : सावंतवाडी तालुक्यातील डेगवे-बाजारवाडी येथील भर बाजारपेठेतील रुपेश केसरकर यांच्या घराला काल रात्री शॉर्टसर्किट होऊन आग लागण्याची घटना घडली. आज विझविताना रुपेश केसरकर हे गंभीर जखमी झालेत. त्यांच्यावर सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर त्यांचे बंधु गंगाराम केसरकर यांच्या हाताला व पायाला भाजल्याने दुखापत झाली. या आगीत घरातील सामानासह दोन दुचाकी जळून खाक झाल्यात. ऐन दिवाळीत केसरकर कुटुंबियांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. स्थानिकांना रात्री उशिरा आग विझविण्यात यश मिळाले. आज सकाळी बांदा पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.

Sawantwadi fire
हायकोर्टाकडून सेशन्स कोर्टाचा निर्णय रद्द, देशमुख पुन्हा ईडीच्या ताब्यात

याबाबत सविस्तर माहिती अशी की, काल रात्री उशिरा विद्युत रोषणाई करण्यासाठी घराच्या दारासमोर लावलेल्या चायनामेड दीप माळेने पेट घेतला. माळेच्या खाली असलेल्या दुचाकींवार आगीची ठिणगी पडल्याने इलेक्ट्रिक बाईक व ऍक्टिव्ह दुचाकीने पेट घेतला. यावेळी रुपेश केसरकर हे आपली पत्नी, मुलगा व वृद्ध आईसह घरात होते. त्यांनी प्रसंगावधान दाखवत सर्वांना घराच्या पाठीमागील दरवाज्यातून सुरक्षितरीत्या घराबाहेर काढले. त्यानंतर ते पुन्हा आपले बंधू गंगाराम यांच्यासह आग विझविण्यासाठी घरात शिरले. मात्र आगीने रौद्ररूप धारण केले होते.

Sawantwadi fire
दिल्ली पुन्हा प्रदूषणाच्या विळख्यात

घरात साठून ठेवलेल्या मिरच्यांची पेट घेतला. मिरचीच्या धुराने रुपेश केसरकर यांचा श्वास गुदमरल्याने ते तेथेच कोसळले, त्यांना तात्काळ सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. तर गंगाराम केसरकर यांच्यावर बांद्यात उपचार करण्यात आले. स्थानिक व्यापारी व ग्रामस्थ यांनी उशिरा आग विझवली. केसरकर यांच्या घराच्या मागे दुकानातील माल साठविण्यासाठी गोदाम आहे. मात्र सुदैवाने गोदमाने पेट न घेतल्याने मोठा अनर्थ टळला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Malvan Fish Prices Paplet Surmai Rates
Chiplun Municipality Meeting and ₹15 Lakh Allegation
Ratnagiri Political Drama
vishal khamesara
Marathi News Esakal
www.esakal.com