esakal | भन्नाट! दीडशे वर्ष जुन्या चंदनाच्या एका झाडाची किंमत ऐकून व्हाल थक्क
sakal

बोलून बातमी शोधा

kokan

भन्नाट! दीडशे वर्ष जुन्या चंदनाच्या एका झाडाची किंमत ऐकून व्हाल थक्क

sakal_logo
By
राजेश कळंबटे/

रत्नागिरी : चाफवलीतील (ता. संगमेश्‍वर) देवरहाटीमध्ये दीडशे वर्षे जुने असलेल्या एका झाडाची किंमत शंभर कोटीपर्यंत जाऊ शकते असा दावा अभ्यासकांकडून केला जात आहे. ते झाड दुर्मिळ रक्त चंदनाचं असून त्याच्या लागवडीची माहिती गुलदस्त्यातच आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातील किंवा स्थानिक बाजारातील रक्त चंदनाची मागणी, त्याचा उपयोग पाहता रक्त चंदनाच्या झाडाला तेवढी किंमत मिळू शकते. स्थानिक असोत किंवा वनविभाग या झाडाची नेहमीच काळजी घेत आहेत.

लाकडापासून बनवण्यात येणार्‍या वस्तूंना आंतरराष्ट्रीय बाजारात मिळणारी किंमत पाहता हे झाड शंभर कोटीचे बनले आहे. याबाबत अभ्यासक संदीप कांबळे म्हणाले, चाफवलीतील झाडाची उंची २५ ते ३० मीटर असून बुध्यांचा घेर १५ ते १७ फुटाचा आहे. बाजारात सहा हजारापासून वीस हजार रुपयांपर्यंत लाकडाचा दर मिळतो. या लाकडा घनता अधिक असल्याने १ बाय १ फुटाच्या तुकड्याचे वजन दहा किलो भरते. दीडशे वर्षांपूर्वीच्या झाडाच्या लाकडांचे वजन तीस हजार किलो झाल्यास लाकडाची किंमत वीस ते बावीस कोटीपर्यंत पोचते. लाकडापेक्षाही त्यापासून बनविण्यात येणार्‍या मुर्तींना मागणी आहे. छोट्या मुर्तींची किंमत चार लाखापर्यंत जाते. चीनसह आखाती देशांमध्ये याला मोठी मागणी आहे. तसेच आयुर्वेदातही त्याचा वापर होतो. या झाडाचे लाकुड तरंगत नाही, ते बुडते हे त्यांचे वैशिष्ठ्य आहे

रक्त चंदन हे विशेषतः तामिळनाडू आणि आंध्रप्रदेशमधील चित्तुर, कडप्पा, कुरनुल आणि नेल्लोर चार जिल्ह्यांमध्ये आढळतात. ऑस्ट्रेलिया, जपान, सिंगापूर, संयुक्त अमिरात इत्यादी ठिकाणी याचा मोठा व्यापार होतो. साधारण तीस ते चाळीस वर्षांपूर्वी चाफवलीत कातभट्टी चालवली जात होती. त्यावेळी तेथे विविध प्रांतातील लोक काम करायची. बैल पातळ असं शेण टाकू लागल्यानंतर ते या झाडाची साल उगाळून त्यांना देत असत. त्यानंतर त्यांचे बैल ठणठणीत होत होते. झाड औषधी आहे, हे ग्रामस्थांच्या लक्षात आले.

काही वर्षांपूर्वी या ठिकाणची झाडं तोडली गेली होती. पण औषधी आणि दुर्मिळ झाडं तोडायची नाही, असा निर्णय एकमुखानं घेतला. त्यामुळे हे झाड वाचले. ते झाड रक्तचंदनाचे आहे, अशी माहिती पाच वर्षांपूर्वी मिळाली. ते कदाचित पक्ष्यांच्या विष्ठेमधून किंवा ब्रिटीश काळात कुणीतरी ते लावले असावं अशी शक्यता ग्रामस्थ प्रकाश चाळके यांनी व्यक्त केली. काही वर्षांपूर्वी हे झाड चोरण्याचा प्रयत्न झाला होता. त्यामुळे स्थानिक ग्रामस्थांसह वनविभागाकडे त्यावर लक्ष ठेवून आहे.

यासाठी होतो उपयोग

  1. मूर्ती घडवण्यासाठी वापर

  2. उच्च प्रतीच्या दारुत वापर

  3. आयुर्वेदामध्ये लाकडाला महत्त्व

  4. सुज किंवा मुकामार यासाठी लेप करुन वापरतात

''चाफवलीतील नागरिक सतर्क असल्यामुळे झाडाच्या सुरक्षेचा प्रश्‍न येत नाही. दिवसभरातून त्याची पाहणी केली जाते.''

- तौफिक मुल्ला, वनपाल, देवरूख

loading image
go to top