

Sayaji Shinde pays tribute to trees by visiting the deforested area in Karjat
Sakal
कैलास म्हामले
कर्जत : कर्जत तालुक्यातील टोरेंट कंपनीच्या साईडोंगर जलविद्युत प्रकल्पासाठी सुरू असलेल्या वृक्षतोडीचा मुद्दा राज्यभर गाजत असताना शनिवारी (७ नोव्हेंबर) अभिनेते व पर्यावरणप्रेमी सयाजी शिंदे यांनी वृक्षतोड झालेल्या जंगलाची सहकुटुंब पाहणी केली. यावेळी त्यांनी तोडण्यात आलेल्या झाडांना श्रद्धांजली वाहत तीव्र संताप व्यक्त केला.