esakal | पालीत आठवडाभर शाळा बंद; दोन आठवडे बाजारही बंद 
sakal

बोलून बातमी शोधा

 School closed for a week in Palit market is also closed for two weeks covid 19 kokan marathi news

जिल्ह्यात पुन्हा कोरोनाचे रुग्ण सापडू लागल्याने सर्वत्र दक्षता बाळगली जात आहे.

पालीत आठवडाभर शाळा बंद; दोन आठवडे बाजारही बंद 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

रत्नागिरी :  पाली येथे कोरोनाचे दोन रुग्ण आढळल्याने ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील सर्व शाळा, महाविद्यालये 27 फेब्रुवारीपर्यंत बंद ठेवण्याचे आवाहन ग्रामपंचायतीने केले आहे. दोन आठवड्यांसाठी आठवडा बाजारही बंद ठेवण्यात येणार आहे. 


जिल्ह्यात पुन्हा कोरोनाचे रुग्ण सापडू लागल्याने सर्वत्र दक्षता बाळगली जात आहे. पाली ग्रामपंचायत क्षेत्रातही 2 बाधित रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे पाली ग्रामपंचायतीच्या ग्राम कृतिदल समितीच्या गुरुवारी पार पडलेल्या बैठकीत ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील सर्व शाळा, अंगणवाडी, हायस्कूल, कॉलेज, आयटीआय, प्रायव्हेट क्‍लासेस 20 ते 27 फेब्रुवारीपर्यंत बंद ठेवण्याचे आवाहन केले आहे.

हेही वाचा- उटीतील अपयशावर मात  करत राजापूरच्या काजोलचा सुवर्णपदकाचा चौकार

पालीत दर बुधवारी आठवडा बाजार भरतो. तो पुढील दोन आठवडे बंद ठेवण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. पाली कार्यक्षेत्रात विनामास्क व्यक्ती आढळल्यास 100 रुपये दंड ठोठावण्यात येणार आहे. अशी माहिती सरपंच संतोष धाडवे यांनी दिली आहे. 
 

संपादन - अर्चना बनगे